घरमुंबईवडाळ्यात जळते मांजर झोपडीवर पडल्याने लागली आग

वडाळ्यात जळते मांजर झोपडीवर पडल्याने लागली आग

Subscribe

जळणारं मांजर झोपडीवर पडल्याने आगीचा भडका उडून संपुर्ण झोपडीला आग लागली.

मुंबईत बुधवारी एका रात्रीत तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबईतील सांताक्रुझ येथील मिलन सब-वे येथील एका गोदामाला भीषण आग लागल्याने तीन गोदामं जळून खाक झाली तर एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग्रीपाडा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली. तसेच, वडाळ्यातील गणेशनगर झोपडपट्टीला देखील भीषण आग लागली. या तीनही घटनापैकी वडाळ्यात झोपडीला लागलेल्या आगीचे कारण समोर आले आहे. रात्रीच्या वेळी मांजराचा उच्च रक्तदाब असणाऱ्या वाहिनीला स्पर्श झाला. या तारेतून जाणारा वीजप्रवाह जास्त असल्याने मांजर चिटकलं आणि त्याला आग लागली. हे जळणारं मांजर झोपडीवर पडल्याने आगीचा भडका उडून संपुर्ण झोपडीला आग लागली.

सौ. ABP माझा

बुधवारी रात्री वडाळा पुर्वेतील गणेशनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत जागृती चिकटे, जयश्री खारगावकर या महिलांसह स्वरा चिकटे, अंश खारगावकर, खुशी चिखले, आणि दिप्ती खारगावकर ही लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर सायन आणि केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

असा घडला प्रकार

बुधवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एक मांजर एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या मारत होती. या मांजराचा उच्च रक्तदाब असणाऱ्या वाहिनीला स्पर्श झाला. या तारेतून जाणारा विजप्रवाह जास्त असल्याने मांजर चिटकल आणि त्याला आग लागली. हे जळणार मांजर झोपडीवर पडल्याने आगीचा भडका उडून काही क्षणात झोपडीने पेट घेतला. या आगीमुळे झोपडी जळून खाक झाली. तीन दिवसापुर्वी हे कुंटुब रायगड जिल्ह्यातील दिघी गावात राहायला असून ते मुंबईला आले होते.


मुंबईत एका रात्रीत तीन ठिकाणी आग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -