घरताज्या घडामोडीसायन, भाभा रुग्णालयात आगीच्या कॉलने खळबळ!

सायन, भाभा रुग्णालयात आगीच्या कॉलने खळबळ!

Subscribe

भंडारा रुग्णालयात भीषण आग लागल्याची आणि त्यात जीवित हानी झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यातच कोरोनावरील लसीचा पुरवठा करणाऱ्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीतही भीषण आग लागून जीवितहानी झाल्याने राज्यात खळबळ उडाली. त्यात आज सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात आग लागल्याचा कॉल आल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या गाडयांनी तात्काळ सायन रुग्णालयात धाव घेत तात्काळ बचावकार्य सुरू केले. आगीमुळे इमारतीत अडकलेल्या काही जणांची सुखरूप सुटका केली. यावेळी, मुंबई महापालिका पालिका सुरक्षादलाच्या अधिकारी, सुरक्षारक्षकांनी रुग्णालयातील गर्दीला थोपविण्याचे मोलाचे कार्य केले.

sion hospital fire mock drill
सायन रुग्णालय आग दुर्घटना मॉक ड्रिल

अर्ध्या तासात समजलं आगीचं कारण!

मात्र, अवघ्या अर्ध्या तासातच या आगीमागील कारण समोर आले. अग्निशमन दल, सायन रुग्णालय व्यवस्थापन आणि पालिका सुरक्षा दल यांनी आपत्कालीन घटना घडल्यास बचावकार्य कसे करावे, याबाबतचे ते प्रात्यक्षिक म्हणजे ‘मॉक ड्रिल’ होते हे स्पष्ट झाले आणि रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

- Advertisement -

वास्तविक, पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी राज्यातील भीषण आगीच्या घटना पाहता मुंबईतील रुग्णालयात आग आपत्कालीन घटनेबाबत ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या रुग्णालयात शुक्रवारपासून ‘मॉक ड्रिल’ला सुरुवात करण्यात आली. नायर रुग्णालयात ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले. त्यामध्ये अग्निशमन दल, मुंबई महापालिका सुरक्षा दल, रुग्णालय स्टाफ आदी ४७० जणांनी सहभाग घेऊन ‘मॉक ड्रिल’ यशस्वीपणे पार पाडले.

sion hospital fire mock drill
सायन रुग्णालय आग दुर्घटना मॉक ड्रिल

अडकलेल्यांची तात्काळ सुटका!

आज म्हणजे शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास सायन रुग्णालयातील इमारतीत अचानक आग लागल्याची घटना घडली आणि त्यात काही माणसे अडकल्याने रावळी कॅम्प, वडाळा, धारावी येथील अग्निशमन केंद्राच्या तीन-चार गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने रुग्णालयातील नागरिकांची घटना बघण्यासाठी गर्दी झाली. एवढ्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग विझवली आणि आगीमुळे अडकलेल्या लोकांची तात्काळ सुटका केली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पालिका सुरक्षारक्षक, रुग्णालयीन कर्मचारी, अभियंते यांना आग लागल्यास कशा प्रकारे आग विझवण्यात यावी, आगीपासून नागरिकांचे, मालमत्तेचे कसे रक्षण करावे याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामुळे आपत्कालीन घटनेला धैर्याने तोंड देण्याचे धडे रुग्णालयीन व्यवस्थापनाला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -