घरमुंबईउल्हासनगर स्फोटकांच्या ढिगावर..विठ्ठलवाडी पोलीस मात्र अनभिज्ञ?

उल्हासनगर स्फोटकांच्या ढिगावर..विठ्ठलवाडी पोलीस मात्र अनभिज्ञ?

Subscribe

उल्हासनगर शहरात पोलिसांनी एका टेक्सटाईल कंपनीच्या गोडाऊनवर छापा मारुन कोट्यवधी रुपये किंमतीचा अनधिकृत फटाक्यांचा साठा जप्त केला. याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना कुठलीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. उल्हासनगर कँप ४ येथील महानगर गॅस पेट्रोल पंपासमोरील पातेळेश्वर मंदिराशेजारील डिएन टेक्सटाईल कंपनीच्या पहिल्या माळ्यावर मोठ्या प्रमाणांत स्फोटकांचा साठा करण्यात आला होता.

यासंदर्भातील माहिती प्रकाश तलरेजा या माहिती अधिकार कार्यकर्त्याला मिळाली. त्यांनी याबाबत उल्हानगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांना कळवले. पोलीस उपायुक्तांनी आपल्या पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील यांना चौकशीचे आदेश दिले. पाटील यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेंद्र शिरसाठ यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी यांनी या ठिकाणी संयुक्त कारवाई केली. यात कोट्यवधींचा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करुन पोलीस हवालदार कृष्णा गणेश पाटील यांच्या तक्रारीनुसार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

या प्रकरणी संशयित आरोपी सन्नी अनिल राजवानी आणि हरेश हिरानंद राजवानी यांची चौकशी सुरू आहे, मात्र मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती. या प्रकरणातील तक्रारदार प्रकाश तलरेजा यांना पोलिसांसमोर युनिव्हर्सल फटाका दुकानाचे मालक राजवानी बंधू यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मात्र याकडे पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

मला जी माहिती मिळाली ती मी पोलीस उपायुक्तांना सांगितली. त्यांनी शहानिशा केली. या ठिकाणी फटाक्यांचा बेकायदा साठा पोलिसांना मिळाला. मी प्रामाणिकपणे सामान्य जनतेचा धोका टळावा यासाठी काम केले. माझे प्राण वाचविणे पोलिसांच्या हातात आहे. त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे.
– प्रकाश तलरेजा, माहिती अधिकार कार्यकर्ता

- Advertisement -

आम्ही टाकलेल्या छाप्यात अनेक स्फोटक असे फटाके मिळाले आहेत. जर काही अनवधानाने घडले असते तर मोठी जिवितहानी झाली असती. संपूर्ण तपास केल्यानंतरच याबाबत कारवाई करता येईल.
– सुरेंद्र शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे

 

दत्ता खरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -