जमिनीच्या वादातून महामार्गावर गोळीबार

Mumbai
representative photo
प्रातिनिधिक फोटो

जमिनीच्या वादातून एका पेट्रोलपंप मालकाच्या रिव्हॉल्वरमधून पाच गोळ्या झाडण्यात आल्याची घटना महामार्गावरील एका डेअरीत घडली आहे. संतोष भुवन पेट्रोल पंपाचे मालक एस.पी.सिंग हे रविवारी सायंकाळी कामण-भिवंडी महामार्गावरील भजनलाल अ‍ॅन्ड सन्स या डेअरीजवळ थांबले होते. त्यावेळी तिथे त्यांचा सोहेल खान यांच्याशी जमिनीवरून वाद झाला. त्यात झटापट होऊन खानने सिंग यांच्याजवळील परवानाधारक रिव्हॉल्वर खेचून घेतले आणि त्यातील पाच गोळ्या हवेत झाडल्या.

कानठळ्या बसणारे आवाज झाल्यामुळे डेअरीतील लोक भयभीत होऊन पळून गेले. भजनलाल अ‍ॅन्ड सन्स या डेअरी लस्सी, बासुंदी, ताक, मठ्ठा, दुध, खीर, रबडी अशा पेयांसाठी सुप्रसिद्ध आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि कामण-भिवंडी राज्यमार्गालगत ही डेअरी असल्यामुळे तिथे दिवसभर गर्दी असते.

रविवारी सायंकाळी गर्दीच्या वेळी हवेत गोळीबार झाल्यामुळे ग्राहक भयभीत झाले होते. सुदैवाने गोळीने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, त्यानंतर झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. या गोळीबाराची माहिती मिळाल्यावर वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सिंग, खान यांच्यासह अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here