रात्री फटाके फोडल्याबद्दल मुंबईत पहिला गुन्हा दाखल

Mumbai
firecrackers bursting
दिवाळीच्या काळात आगीच्या घटना

सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यावर आखून दिलेली वेळ पाळली नाही, या कारणावरून मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दोन अज्ञात इसमांविरुद्ध दाखल करण्यात आला असून आखून दिलेल्या वेळेनंतर फटाके फोडणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेण्यात येत आहे. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी फटाके वाजवण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ सर्वोच्च न्यायालयाने आखून दिली होती. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. ज्या व्यक्ती रात्री १० नंतर फटाके वाजवतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली असून गुरुवारी मानखुर्द येथील आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात दोन अज्ञात जणांविरुद्ध भा.दं.वि. १८८, ३४, ३३ (यु) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फटाके विक्रेत्याने उडवली कोर्टाची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

मानखुर्द महाराष्ट्र नगर कॉलनी इमारत क्रमांक १७/१८ या ठिकाणी राहणारे आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी रात्री ते घरी असताना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या इमारती जवळ दोन अनोळखी मुले फटाके वाजवत होते, फटाक्यांच्या आवाजामुळे त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे शकील यांनी त्या मुलांना फटाके वाजवण्यास मनाई देखील केली. मात्र त्यांनी शकील यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून फटाके वाजवणे सुरूच ठेवल्यामुळे अखेर शकील यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्ष १०० क्रमांकावर तक्रार केली. पुरावा म्हणून त्यांनी स्वतःच्या मोबाईल फोनवर त्याचे चित्रीकरणसुद्धा केले. काही वेळाने ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे दोन बीट मार्शल त्याठिकाणी आले असता पोलिसांना बघून ती दोन्ही मुले पळून गेली. पोलिसांना त्या ठिकाणी कोणीही दिसून न आल्यामुळे पोलीस अखेर निघून गेले, अशी माहिती शकील अहमद शेख यांनी दिली.

दरम्यान शेख यांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नगर पोलीस बिट चौकीत जाऊन तक्रार दाखल केली. अखेर रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात शेख यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ट्राम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक(प्रशासन) कुटे यांना भेटून मी त्यांना सल्ला दिला आहे कि, आपण सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाबाबत फटाके फोडण्याबाबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी पोलीस वाहनातून मेगाफोनच्या माध्यमातून घोषणा करावी, जेणेकरून नागरिकांना सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाची माहिती मिळेल. शकील अहमद शेख, आरटीआय कार्यकर्ता

फटाके विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here