घरमुंबईवेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

वेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांसंदर्भात घातलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी रात्री ८ ते १० वेळेची मर्यादा निश्चित केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात पोलिसांनी केली आहे. राज्यात प्रथमच अवेळी फटाके फोडल्यावे मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे अजून समोर आली नसून ट्रॉम्बे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

स्थानिक आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पोलिसांकडे मध्यरात्री फटाके उडवित असल्याची तक्रार केली. याची माहिती मिळताच मानखुर्द उपनगरातील महाराष्ट्रनगरमध्ये पोलीस पोहोचले. आरोपींवर कलम १८८ अंतर्गत दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश साळवी यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -