घरमुंबईबायफोकलची पहिली यादी नव्वदी पार

बायफोकलची पहिली यादी नव्वदी पार

Subscribe

8 हजार 765 विद्यार्थ्यांना मिळाले प्रवेश

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची बायफोकल विषयाची पहिली यादी 25 जून रोजी जाहीर झाली. बायफोकलची पहिल्या यादीत नामवंत कॉलेजांची कट ऑफ नव्वदीच्या पलिकडेच राहिली आहे. पहिल्या यादीत 8 हजार 765 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. नामवंत महाविद्यालयांतील अनुदानित व विनाअनुदानित तुकड्यांतील बायफोकलच्या जागा पटकवण्यासाठी कटऑफच्या गुणांमध्ये मोठी टफ फाईट झाली आहेत.

ठाण्यातील एमएच मराठी हायस्कूलची कम्युटर सायन्सची कटऑफ 97.60 टक्क्यांवर तर इलेक्ट्रॉनिक्सची 96.20 आणि इलेक्ट्रीक मेन्टेनन्सची कटऑफ 95.60 टक्क्यावर पोहचली. रुपारेल कॉलेजातील कॅम्प्युटर सायन्सची कटऑफ 97.20 टक्क्यांवर तर साठ्ये कॉलेजाची 94.80 वर बंद झाली. अकरावी प्रवेशातील द्विलक्षी (बायफोकल) अभ्यासक्रमासाठी मुंबई एमएमआर विभागातील महाविद्यालयात असणार्‍या 28 हजार 644 जागांसाठी 14 हजार 481 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील आठ हजार 765 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. दहावीचा निकाल घसरल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग खडतर झाला होता. परंतु बायफोकल अभ्यासक्रमासाठी एसएससी बोर्डाच्या 10 हजार 262 विद्यार्थ्यांपैकी सहा हजार 363 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तर सीबीएसई बोर्डाच्या 1679 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील 963 विद्यार्थी तर आयसीएसई बोर्डाच्या 2234 विद्यार्थ्यांपैकी 1334 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

- Advertisement -

यावर्षी एकच यादी असून पहिलीच यादी नव्वदी पार केली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली नाही. त्यांना जनरल प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बायफोकलमधून प्रवेश मिळाला नाही, त्या विद्यार्थ्यांना जनरल प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -