घरमुंबईमुंबईत मान्सून पूर्व पावसाच्या सरी

मुंबईत मान्सून पूर्व पावसाच्या सरी

Subscribe

मुंबईत रविवारी रात्री पहिला पाऊस दाखल झाला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा आला आहे.

मुंबईत रविवारी रात्री मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. ढगांच्या गडागट आणि विजेच्या कडकडाटासह पहिला पाऊस मुंबईत दाखल झाला. उकाड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर पावसाची वाट पाहत होते. अखेर मुंबईकरांची ही प्रतिक्षा संपली असून पहिला पाऊस मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास दादर, परळ, सीएसटी आणि कुर्ला परिसरात पावसाच्या जोरदार सरि बरसल्या. त्याअगोदर मुंबईतील इतर भागांमध्येही पाऊसाच्या सरि कोसळल्या.

वातावरणात गारवा; ढगाळ वातावरण

पावासामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. थंडगार वारा सुरु आहे. याशिवाय सोमवार सकाळपासून मुंबईतील वातावरण ढगाळ आहे. मान्सून पूर्व पावसानंतर सोशल मीडियावर पावसाच्या कविता वाचायला मिळत आहेत. अनेक कवींनी आपल्या पहिल्या पावसाच्या कविता सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील वातावरण कवितांनी बहरले आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत लवकरच मान्सून सुरु होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -