घरताज्या घडामोडी२५ वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्व द्रुतगती मार्गावर धावली डबल डेकर!

२५ वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्व द्रुतगती मार्गावर धावली डबल डेकर!

Subscribe

गुरुवारपासून पूर्व द्रुतगती मार्गावर भाडूप पंपिंग स्टेशन, मुलुंड इस्ट ते सायनपर्यंत ही सेवा सुरू केली. त्यामुळे या मार्गावरील बेस्ट प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे बेस्टची प्रवासी संख्या वाढल्याने बेस्ट प्रशासनाने डबर डेकर बसेस अनेक मार्गावर उतरविल्या आहेत. गुरुवारपासून पूर्व द्रुतगती मार्गावर भाडूप पंपिंग स्टेशन, मुलुंड इस्ट ते सायनपर्यंत ही सेवा सुरू केली. त्यामुळे या मार्गावरील बेस्ट प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टकडून अत्यावश्यक सेवेतील बसेस सुरू होत्या. मात्र, आता अनलॉकच्या टप्प्याची सुरुवात झाल्याने मुंबईकर घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे बेस्टची प्रवासी संख्या झपाट्याने वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत बेस्टच्या बसेस धावत आहेत. बसेसची संख्या कमी पडत असल्यामुळे आता बेस्टकडून डबल डेकर बसेस सुरू केल्या आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर गुरुवारपासून भाडूप पंपिंग स्टेशन, मुलुंड इस्ट ते सायनपर्यंत ही सेवा सुरू केली आहे. यापूर्वी कुलाबा ते दादर आणि बॅकबे आगार ते दादर या मार्गांवर बेस्टच्या डबल डेकरच्या दोन विशेष बसेस सुरू केल्या आहेत. आता विक्रोळी ते कुलाबा या मार्गावर डबल डेकर सुरू करण्याचे नियोजन बेस्ट प्रशासन करत आहे. त्यामुळे बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच महामार्गावर बेस्टच्या डबल डेकर बसेस सुरू करण्यात येत आहेत. सध्या बेस्टकडे १२० डबल डेकर बसेसचा ताफा आहे. पूर्वी या बसेस फक्त ठराविक मार्गांवर धावत होत्या. तसेच कोरोनाच्या काळात या सोशल डिस्टन्सिंगच्या काळात डबर डेकर बसची आवश्यकता असल्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर बेस्टने गुरुवारपासून शहरातील अनेक मार्गांवर डबल डेकर सुरू केल्या आहेत.

- Advertisement -

अशी धावणार डबल डेकर  

या डबल डेकर बसेसमधून प्रवास करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून मार्गदर्शक सूचना आखून देण्यात आलेल्या आहेत. या बसेसमध्ये एकच कंडक्टर असणार आहे, तर वरच्या डेकवर प्रवाशांना केवळ बसण्यासाठी परवानगी असणार आहे. बसच्या खालच्या डेकवर बसलेल्या प्रवाशांव्यतिरिक्त, फक्त पाच उभ्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकदा ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर बसमध्ये चढण्यास आणखी प्रवाशांना परवानगी मिळणार नाही.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -