घरगणपती उत्सव बातम्यापाच दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन

पाच दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन

Subscribe

मुंबई : ढोल ताशांचा गजर…गुलालाची उधळण करीत…गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत सोमवारी गणेशभक्तांनी गौरी गणपतीला वाजत गाजत निरोप दिला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९ हजार ७६७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आणि भक्तीरसाने अवघी मुंबई न्हावून निघाली. सर्वत्रच चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण होते. गणरायाच्या चरणी भक्तगण लीन झाले होते. गौरी गणपतींच्या भक्तीत भाविक तल्लीन झाले. माहेरवाशीन गौराईला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा अर्चा करण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर सोमवारी भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात, टाळ – मृदूंगांच्या निनादात वाजत गाजत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

- Advertisement -

मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांंनी दुपारपासून गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने संपूर्ण मुंबई दणाणून गेली. मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर आणि गणरायांचा घननाद सुरू होता. पाऊस नसल्याने नसल्याने भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. पुरुषांबरोबर स्त्रिया, तरुण- तरूणींसह अबालवृध्दांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्यांवर मोठी गर्दी केली होती. सदरा, पायजमा आणि डोक्यावर टोपी अशा पारंपरिक वेषात पाटावर, डोक्यावर, हातात बाप्पाची मूर्ती घेवून भाविकांनी समुद्र, तलाव आणि कृत्रीम तलावात बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पाडले. विसर्जनस्थळी पालिकेद्वारे योग्य असे नियोजन करण्यात आले होते.

गणपती मूर्ती विसर्जन

सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९७६७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात ८६ सार्वजनिक, ८८४० घरगुती आणि ८४१ गौरींचा समावेश आहे. विसर्जन करण्यात आलेल्या ९७६७ मूर्तींपैकी कृत्रीम तलावात १७०५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात १४ सार्वजनिक, १५८३ घरगुती गणपती आणि १०८ गौरींचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -