घरमुंबईरेल्वे पाठोपाठ, एमआयडीसीने महावितरणची केबल तोडली

रेल्वे पाठोपाठ, एमआयडीसीने महावितरणची केबल तोडली

Subscribe

ठेकेदाराला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

महावितरणची उच्च वीजदाब वीज ग्राहकांची केबल सलग दुसर्‍यांदा सरकारी यंत्रणेतीलच विभागाकडून तोडण्याचा प्रकार समोर आला आहे. रेल्वे पाठोपाठ आता एमआयडीसीकडून महावितरणच्या यंत्रणतेली केबलचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होतानाच महावितरणच्या यंत्रणेचे नुकसान झाल्याचा सलग दुसरा प्रकार समोर आलेला आहे.

गेल्याच आठवड्यात कळवा सबस्टेशनमधून येणार्‍या मुख्य वाहिनीला रेल्वेमार्फत सुरू असलेल्या कामाचा फटका बसला. त्यामुळे तब्बल दहा तास हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. घणसोली, तळवली, रबाळे यासारख्या गावांमध्ये रेल्वेच्या सुमार कामाचा फटका बसला. रेल्वेच्या कामादरम्यान वापरण्यात येणार्‍या उपकरणातून महावितरणची केबल तुटली होती. त्यामुळे संपुर्ण उच्चदाब केबलमधील दोष दुरूस्त करून नवीन केबल जोडण्यासाठी महावितरणला दहा तास इतका कालावधी लागला. त्यानंतर महावितरणच्या नवी मुंबई परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत झाला.

- Advertisement -

निष्काळजीपणे काम करण्याचा फटका पुन्हा एकदा नवी मुंबईतील महावितरणच्या वीज ग्राहकांना एमआयडीसीच्या माध्यमातून आला. एमआयडीसीमध्ये नवीन पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यासाठीचे खोदकाम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. नवी मुंबई परिसरातील डी वाय पाटील उच्चदाब वाहिनीला अत्यंत जोरदारपणे जेसीबीने प्रहार झाला. त्यामुळे या परिसरात जोरदार धमाका झाला. या कामादरम्यान या संपुर्ण उच्चदाब वीज वाहिनीचा वीज पुरवठा खंडीत झाला. शिवाय १ लाख १३ हजार ६३७ रूपयांचे महावितरणच्या यंत्रणेचे नुकसानही झाले. महावितरणच्या शाखा अभियंत्याने याबाबत पाठपुरावा केला असता एमआयडीसीने नेमलेल्या कंत्राटदाराकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर महावितरणच्या प्रशांत भानुशाली या सहाय्यक अभियंत्याने एमआयडीसीच्या ठेकेदाराविरोधात पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा नोंदवला. या घटनेची ठाणे सत्र न्यायालयाने गंभीर दखल घेत एमआयडीसीने नेमलेल्या मल्हार एंटरप्राईझेसचे ठेकेदार मोहन नेटके यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महावितरणने याआधीच्या रेल्वेच्या घटनेत मात्र कोणताही गुन्हा रेल्वेच्या ठेकेदाराविरोधात नोंदवलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -