घरमुंबई10 वर्षे आणखी दु: खाची

10 वर्षे आणखी दु: खाची

Subscribe

उघडे कुटुंबियांनी व्यक्त केली निराशा

२६/११ दहशतवादी हल्ल्यात माझे वडील शहीद झाले. त्याचा मला अभिमानच आहेच. पण आज आमच्यासमोर आर्थिक अडचणींची परीक्षा उभी राहिली आहे. सरकारने वडिलांच्या जागेवर भावाला नोकरी दिली. पण काही वेळातच त्याचे निधन झाले. त्यामुळे आता आमच्यासमोर आर्थिक प्रश्न सतावित आहेत, भावाच्या जागेवर नोकरीसाठी वारंवार मंत्रालय दरबारी ही गेलो पण कोणाला आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची खंत, शहीद बबन उघडे यांचे पुत्र विकास उघडे यांनी उपस्थित केला आहे.

26-11 च्या हल्ल्यात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. त्यामध्ये एक होते ते म्हणजे कामा हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असणारे बबन वाल्हू उघडे. या हल्ल्यात बबन उघडे यांच्या पोटात गोळी लागली. अतिरेकी हॉस्पिटलमध्ये घुसले आहेत हे कळल्यानंतर जीवाची पर्वा न करता बबन उघडे हे हॉस्पिटलच्या गेटजवळ आले. पण, अतिरेक्यांनी खूप दुरुनच त्यांच्यावर गोळी झाडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळेस उघडे यांचं पूर्ण कुटुंब कामा हॉस्पिटलमध्ये राहत होतं. उघडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी त्यांचा मोठा मुलगा विलास उघडे अनुकंपा तत्वावर नोकरीवर लागला. पण, त्याचाही काही वर्षानंतर आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याच जागी त्यांचा छोटा मुलगा विकास लागावा आणि घराला कमावणारी व्यक्ती मिळावी यासाठी त्यांची आई सुशिला बबन उघडे गेली अनेक वर्ष संघर्ष करत होत्या. पण, सरकारपुढे कोणाचं चालणार ? हॉस्पिटलमधून अनेकदा त्यांच्या अर्जाची सरकारपुढे ठेवण्यात आली. पण, आश्वासनांशिवाय त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.

- Advertisement -

या हल्ल्यानंतर सरकारने सुरक्षार क्षकांना इतर काही आश्वासने दिली होती. पण ती पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यासाठी पार नवी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलो होतो. पण, नंतर ते फक्त सरकारच्या हॉस्पिटलमधील सुरक्षारक्षकांसाठी असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. वडीलांनी देशासाठी आपले प्राण गमावले याचा आजही अभिमान वाटतो. पण, कायम त्यांची उणीव आम्हा सर्वांना जाणवते, अशाही भावना विकास यांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच वारंवार कामा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथून आमचा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवला जायचा. पण, सरकारकडून आजही आमचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आम्ही काहीतरी गमावलेलं आहे याची आठवण वारंवार प्रशासनाला करुन द्यावी का ? असा ही प्रश्न विकास यांनी विचारला आहे.

तो दिवस नकोसा वाटतो…

26-11-2008 साली हा हल्ला झाला होता. या घटनेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही, आज तो दिवस आठवला की अंगावर शहारे येतात. तो दिवस भयानक होता त्यामुळे आजही नकोसा वाटतो. सरकारचं आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे. गेली 10 वर्ष ही परिस्थिती तशीच आहे. सध्या मी शिकून जॉब करतोय. सरकारने अनुकंपा तत्त्वावर वडिलांच्या जागी मोठ्या भावाला नोकरी दिली पण, त्याचा 2013 ला मृत्यू झाला. त्या जागी मला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करुनही आजही नोकरी मिळालेली नाही. दरवर्षी फक्त 26-11 या दिवशी सर्वांना आमची आठवण येते. अशी खंत शहीद बबन उघडे यांचा मुलगा विकास उघडे यांनी व्यक्त केली आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -