घरमुंबईलोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठीचा जागर

लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठीचा जागर

Subscribe

मराठी भाषा दिनानिमित्त दरवर्षी स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर 27 फेब्रुवारीला महासंघातर्फे न्यू मरीन लाईन्स येथील बॉम्बे हॉस्पिटल शेजारील बिर्ला मातोश्री सभागृहात मराठी भाषा दिनानिमित्त मराठीचा जागर करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित राहणार आहेत.

स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, महसंघाचे कार्याध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार आनंदराव अडसूळ आणि शिवसेना सचिव, महासंघ सरचिटणीस, खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध कार्यकारी समित्या निर्माण केल्या असून, त्याच्यांवर वेगवेगळ्या जबाबदार्‍या सोपवण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महासंघ पदाधिकारी आणि संलग्न समित्यांचे पदाधिकारी जोरदार कार्यरत आहेत.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महासंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढाईत वापरलेल्या तीन पैकी एक ‘जगदंब फिरंग’ या तलवारीची 48 इंच लांबीची हुबेहुब प्रतिकृती भेट देण्यात येणार आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे सडेतोड वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना याप्रसंगी पारितोषिक देण्यात येणार आहे. परिसरात भगवे झेंडे, भगव्या पताका आणि मराठी भाषा दिवसाचे बॅनर्स लावून संपूर्ण परिसर भगवामय करण्याची जबाबादारी दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ आणि सर्व पदाधिकार्‍यांवर सोपवली आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री, राज्यमंत्री, उपनेते, खासदार, मुंबई महापौर, आमदार, मुंबईचे विभागप्रमुख, महिला विभागसंघटक आणि लोकाधिकार समितीच्या विविध आस्थापनातील उच्च पदस्थ अधिकारी तसेच महासंघाच्या संलग्न समित्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त जीवनकला अनामिका निर्मित साईसाक्षी प्रकाशित बहिणाबाई चौधरीच्या काव्य व जीवनावर आधारित ‘माझी माय सरसोती’ हा नृत्य नाट्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -