कचऱ्यापासून विज निर्मितीकरता उल्हासनगरला परदेशी पाहुण्याची भेट

महाराष्ट्र शासनाच्या कचऱ्यापासून विज बनविण्याच्या बहुचर्चित प्रकल्पाची रूपरेखा ठरवण्यासाठी नेदरलँड येथून परदेशी पाहुणा उल्हासनगरमध्ये आले होते.

Mumbai
meeting
परदेशी पाहुण्याची भेट

महाराष्ट्र शासनाच्या कचऱ्यापासून विज बनविण्याच्या बहुचर्चित प्रकल्पाची रूपरेखा ठरवण्यासाठी नेदरलँड येथून परदेशी पाहुणा उल्हासनगरमध्ये आले होते. त्यांनी शहरातील डम्पिंग ग्राऊंडची पाहणी केली. महाराष्ट्र शासनाने नेदरलँडच्या अॅमस्टरडॅम सिटीसोबत कचऱ्यापासून वीज बनवण्याच्या प्रकल्पासाठी करार केला आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्हातील स्वायत्त संस्थांचे दोन क्लस्टर बनवण्यात आले आहेत. यात कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांचा मिळून एक क्लस्टर बनवण्यात आला आहे.

वाचा – उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जणांचा मृत्यू

क्लस्टरची केली पाहणी 

या क्लस्टरची पाहणी करण्यासाठी नेदरलँडचे नागरिक असलेले प्रकल्प सल्लागार पीटर सिमोस हे गुरुवारी दुपारी उल्हासनगरमध्ये आले होते. त्यांनी म्हारळ गावचे बंद पडलेले डम्पिंग ग्राउंड आणि आकाश कॉलनीमध्ये सध्या सुरु असलेले डम्पिंग ग्राउंड या दोन्हीची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर पालिका आयुक्त अच्युत हांगे, उपायुक्त विकास चव्हाण, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, अभियंता चंद्रगुप्त सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचा – उल्हासनगरमध्ये मोबाईल टॉवर होणार अधिकृत; महापालिकेची परवानगी

प्रकल्पाची रूपरेखा ठरणार 

याबाबत पालिका आयुक्त अच्युत हांगे याना विचारले असता त्यांनी सांगितले की, उल्हासगर शहरात तयार होणाऱ्या घन कचऱ्यात कोणत्या प्रकारच्या वस्तू समाविष्ट असतात. याची पाहणी पीटर सिमोस यांनी केली. या पाहणीत त्यांना आढळलेल्या बाबींची त्यांनी नोंद करून घेतली आहे. त्याप्रमाणे प्रकल्पाची रूपरेखा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील डम्पिंगची समस्या सुटेल. तसेच कचऱ्यापासून वीज बनणार असल्याने पालिकेला आर्थिक लाभ देखील होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here