घरताज्या घडामोडी'या' माजी आमदारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

‘या’ माजी आमदारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Subscribe

आज एका माजी आमदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

मनेसेचे महाअधिवेशन येत्या २३ जानेवारीला मुंबई येथील गोरेगाव संकुलात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी दिशा जाहीर करणार का? अशी जोरदार चर्चा रंगली असतानाच राज ठाकरे यांना कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी सकाळी कृष्णकुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव मनसेत प्रवेश करणार का?, अशी चर्चा सुरु झाली आहे.

कोण आहे हर्षवर्धन जाधव?

हर्षवर्धन जाधव हे मनसेचे माजी आमदार आहेत. २००९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यभरातून मनसेचे १३ आमदार निवडून आले होते, त्यामध्ये हर्षवर्धन यांचा देखील समावेश होता. त्यांनी औरंगाबादमधील कन्नड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला होता. सध्या ते स्वत:च्या शिव स्वराज्य पक्षाचे प्रमुख आहेत.

- Advertisement -

भेटण्यामागचे हे होते कारण?

‘राज ठाकरे साहेबांनी भेटायला बोलावले होते म्हणून आलो होतो. मधल्या काळात साहेबांशी संपर्क नव्हता, काय काम सुरू होते याची सविस्तर माहिती साहेबांना दिली. त्याचप्रमाणे ज्या पक्षाने पहिल्यांदा आमदार केले त्या पक्षासोबत पुन्हा एकदा काम करायला नक्कीच आवडेल, मात्र याबाबत माझा निर्णय अजून झालेला नाही’, असे देखील ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, ते आज राज ठाकरे यांना भेटल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मनेसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा मनसेत प्रवेश करणार का?, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, ते राज ठाकरेंना का भेटले याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.


हेही वाचा – संजय राऊत यांना पदावरून हटवा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -