CoronaVirus: मुंबईत आणखीन ५ नवे करोनाचे रुग्ण, आकडा १५९वर !

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता १२४ वरून १२६वर पोहोचला आहे.

Mumbai
lockdown woman dies due to corona dombivli
कोरोना व्हायरस

राज्यातील करोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आज १५९ वर पोहचली. आज आणखी नव्या ६ करोनाच्या रूग्णांची यामध्ये भर पडली. त्यामध्ये मुंबईतील ५ जणांचा समावेश आहे. तर एक नागपुरचा रूग्ण आहे.

———————————

राज्यातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. नवी मुंबईत आता आणखीन दोघा जणांना करोनाची लागण झाली आहे. मौलविचा मुलगा आणि मोलकरणी पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनो रुग्णांच्या संख्येत दोनने भर पडली असून गुरुवारी नवी मुंबईतील रुग्णांची संख्या ७ वर गेली आहे. मागील काही दिवसात मौलाना किती लोकांच्या संपर्कात आले होते याचा शोध नवी मुबई पोलीस आणि नवी मुंबई महापालिका घेत आहे. मौलाना प्रकरणामुळे नवी मुंबईची चिंता मात्र वाढली आहे. आतापर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२४ वरून १२६ वर पोहोचली आहे.

मागील आठवड्यात नवी मुंबईत आलेल्या फिलिपिन्स नागरिकांपैकी एकजण वाशी येथील मस्जिद मध्ये राहत होता. मौलवी यांचा त्या व्यक्तीशी संपर्क आल्याने त्यांना आठ दिवस होम कोरोनटाईन सुरु होते. मात्र बुधवारी तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केल्याने कोरोनो तपासणी पॉझिटिव्ह आली. मौलवी यांची तपासणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा मुलगा आण् मोलकरणीला देखील तपासणीसाठी कस्तुरबाला नेण्यात आले होते. गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

देशभरात सर्वाधिक करोना रुग्ण हे महाराष्ट्राच आढळले आहेत. आज राज्यात करोनामुळे चौथा बळी गेला आहे. वाशी येथील एका करोनाग्रस्त महिलेचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर वाशी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.तसंच आज काश्मीरमध्ये देखील करोनामुळे ६५ वर्षीय व्यक्तीला मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Coronavirus – महाराष्ट्रात करोनाचा चौथा बळी, करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here