येत्या २६ ऑगस्टला चार हजार आरोग्यसेविका धडकणार आझाद मैदानात

मोर्चाची पालिकेकडून दखल घेतली गेली नाही तर १३ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा

Mumbai
आरोग्य सेविकांचा मोर्चा

मुंबई पालिकेच्या अख्यारितीत येत असलेल्या आरोग्यसेविका येत्या २६ ऑगस्टला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. तसंच, जर या मोर्चाची पालिकेकडून दखल घेतली गेली नाही तर १३ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी आरोग्य सेविकांनी अनेकदा आंदोलनं, संप, उपोषण केले. तरीही, त्यांच्याकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याकारणाने पुन्हा एकदा आरोग्य सेविकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा

मुंबई पालिकेच्या आरोग्य केंद्रात एकूण चार हजार आरोग्य सेविका कार्यरत आहेत. दरमहा १५ हजार रुपये मानधन लागू करण्यात आलं तरीही सेविकांना हे वाढीव मानधन दिलं जात नाही. तसंच, मानधनासह इतर मागण्याही प्रलंबित असल्याकारणाने आरोग्यसेविका संपावर जाणार आहेत. येत्या २६ ऑगस्टला आरोग्यसेविका पालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची पालिकेनं दखल न घेतल्यास १३ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. यामुळे, मुंबईतील २०८ आरोग्य केंद्र बंद राहतील.


हेही वाचा- अखेर २७ तास अदृश्य असलेले चिदम्बरम पत्रकार परिषदेत प्रकटले, म्हणाले…!

अनेक वर्षापासून आरोग्य सेविकांच्या मागण्या प्रलंबित

याविषयी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितलं की, “ आरोग्य सेविकांच्या अनेक मागण्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. वारंवार आंदोलनं आणि संप पुकारूनही पालिका प्रशासन कुठल्याही प्रकारच्या हालचाली करत नाही आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविकांनी येत्या २६ ऑगस्टला पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाची दखल न घेतल्यास मुंबईतील चार हजार आरोग्य सेविका १३ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जातील”

‘‘मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०१७ ला आरोग्य सेविकांना कायमस्वरूपी पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा आदेश दिला होता. पण, पालिका प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. याशिवाय, मानधन वाढ, भरपगारी प्रसूती रजा या मागण्यांचीही दखल घेण्यात आलेली नाही. यासाठी आम्ही आता बेमुद्त संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही पालिकेने कुठलंही पाऊल न उचलल्यास कठोर भूमिका घेऊ.”, असा इशाराही देवदास यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here