घरमुंबई२८ वर्षीय महिलेवर अघोरी कृत्य करून जादूटोणा; भोंदूबाबाला अटक

२८ वर्षीय महिलेवर अघोरी कृत्य करून जादूटोणा; भोंदूबाबाला अटक

Subscribe

भिंवडी येथील एका २८ वर्षीय महिलेवर अघोरी कृत्य करून जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला अघोरी पूजेसाठी बसत नसल्याचे पाहून भोंदूबाबासह ३ साथीदारांनी तिला जबर मारहाण करून अघोरी कृत्य आणि जादूटोणा करण्यासाठी तिच्या डोक्यावरील केसांची बट कापली. ही खळबळजनक घटना भिवंडीतील अंजूरफाटा परिसरातील एका सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांच्या तावडीतून सुटका करीत नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीं विरोधात विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मनोज शंकर गोहिल, त्याची पत्नी जया गोहिल, विनोद चव्हाण आणि गुजराथी महाराज अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील भोंदूबाबासह आरोपी असलेले गोहिल दांपत्य आणि त्याचा चुलत भाऊ (सर्व रा.चरणीपाडा, भिवंडी) हे चारही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ वर्षीय पीडित महिला भिवंडीतील कामतघर परिसरात पतीसह राहत होती. त्या दरम्यान आरोपी मनोज गोहिलशी तिचे प्रेमाचे सूत जुळल्याने तिने पहिल्या पतीला सोडून ती आरोपी मनोज बरोबर राहत होती. मात्र काही महिन्यांपूर्वी आरोपी मनोज गोहिल विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात त्यावेळी पोलिसांनी मनोजला अटक केली होती. त्यांनतर आरोपी मनोज जामिनावर सुटून बाहेर येताच पीडित महिला पुन्हा त्याच्यासोबत राहायला लागली.

- Advertisement -

मात्र त्याचवेळी आरोपीची पहिली पत्नी जया आणि पीडित महिला एकत्र राहत असल्याने त्या दोघींमध्ये सतत भांडण होत होते. यामुळे पीडित महिलेवर अघोरी कृत्य आणि जादूटोणा करून तिच्यापासून पिच्छा सुटावा म्हणून आरोपी गोहिल दापंत्यानी चुलत भाऊ आणि एक गुजराथी भोंदूबाबाशी संगनमत करून पीडित महिलेला भिवंडीतील अंजूरफाटा परिसरातील एका सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये नेऊन अघोरी पूजेसाठी बसवले. मात्र पीडित महिला बसत नसल्याचे पाहून आरोपी गोहिल दापंत्याने भोंदूबाबासह तिला जबर मारहाण केली. तिच्या डोक्यावरच्या केसाची बट कापली.

दरम्यान पीडित महिलेने नारपोली पोलीस ठाणे गाठून तिच्यावर घडलेला प्रसंग कथन केला असता पोलिसांनी मनोज  गोहिल, त्याची पत्नी जया, चुलत भाऊ विनोदसह गुजराथी भोंदूबाबावर नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट – अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भादंवि कलम ३२४, ३२४, ५०४, ५०६, (२) ३४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच भोंदूबाबासह चारही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रविंद्र वाणी करीत आहेत.

एक प्रतिक्रिया

  1. Recently I read about action on footpath vendors( unauthorised) by NMC. Most such actions are proven to be short lived and totally ineffective. In gulf countries action is taken on customers of such vendors which is proven to be highly effective and nonviolent as well. Because customers are never backed by local dada’s.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -