घरमुंबईकामगारांच्या पीएफ निधीचा केला अपहार

कामगारांच्या पीएफ निधीचा केला अपहार

Subscribe

कामगारांचा पीएफ हा पीएफ खात्यावर न जमा होता त्याचा अपहार केला जात होता. त्यामुळे वागळे इस्टेट येथील खासगी कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगारांच्या वेतनातील पीएफच्या खात्यातील रक्कम पीएफच्या कार्यालयात जमा न करता त्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी वागळे इस्टेट येथील खासगी कंपनीच्या संचालकांवर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण घोटणकर (रा. कोलशेत) असे संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पीएफ निधी कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी सचिन पगारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

७१ हजार २२१ रुपये रक्कमेचा अपहार केल्याची तक्रार

वागळे इस्टेट भूमी वेलोसिटी येथे मे.मोटविक इंजिनियरिंग ग्लोबल प्रा.लि. ही कंपनी आहे. या कंपनीचे संचालक घोटणकर हे असून कंपनीत १२ ते १४ कामगार आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत कामगारांच्या वेतनातून कपात केलेली पीएफची रक्कम संचालक घोटणकर यांनी नियमानुसार पीएफ खात्यात जमा केली नव्हती. २५ जानेवारी रोजी या कंपनीमध्ये तपासणी करण्यासाठी गेलेले पीएफ निरीक्षक ए.आर.पाटील यांनी याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार श्रीनगर पोलीस ठाण्यात ७१ हजार २२१ रुपये रक्कमेचा अपहार केल्याची तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे धरणे आंदोलन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -