घरमुंबईएनजीओ व्यस्थापन कसे कराल? जाणून घ्या

एनजीओ व्यस्थापन कसे कराल? जाणून घ्या

Subscribe

एनजीओ व्यवस्थापन विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विविध शासकीय विकास योजनांबाबत माहिती, संवाद कौशल्य, नेतृत्व विकास या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी विविध सामाजिक संस्था (एनजीओ) असतात. मात्र तरीही एनजीओ व्यवस्थापनाबद्दल लोकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे अनेकदा इच्छा असतानाही एनजीओ सुरू करण्यासाठी अडचणी येतात. अशाच तरुण लोकांच्या मार्गदर्शनासाठी ठाणे येथे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी पिपल्स डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे रविवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० ते १:३० वाजेपर्यंत टाऊन हॉल, कोर्ट नाका, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, ठाणे (पश्चिम) येथे संस्था (एन.जी.ओ.) व्यवस्थापन या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कुशल आणि अनुभवी तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. सामाजिक कार्याची आवड असलेल्यांनी आवश्य सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे महासचिव अॅ्ड. जे. जी. यादव यानी केले आहे.

कोणत्या विषयावर मिळणार मार्गदर्शन

या कार्यशाळेमध्ये संस्था (एन.जी.ओ.) नोंदणी, संस्था व्यवस्थापन, संस्थेची कार्यप्रणाली, प्रकल्प नियोजन, प्रकल्प मूल्यमापन, निधी उभारणे, प्रकल्प मंजूरी, संस्थेतर्फे राबविण्यासाठी मिळू शकतील आशा विविध शासकीय विकास योजनांबाबत माहिती, संवाद कौशल्य, नेतृत्व विकास या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी ट्रस्टचे संपर्क कार्यालय, प्रबोधन चौफेर, ऑफिस क्र.१८, दादोजी कोंडदेव स्टेडियम, खारटन रोड, ठाणे (प) येथे सकाळी १० ते सायं.७ वाजेपर्यंत या कार्यलयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा अॅड. किरण कांबळे यांना ९८२१७७६६९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पूर्व नाव नोंदणी करावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -