घरमुंबईमहिला दिनी अबोली रिक्षातून विनामूल्य रिक्षा सेवा

महिला दिनी अबोली रिक्षातून विनामूल्य रिक्षा सेवा

Subscribe

महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सेवेकरिता नवी मुंबई रिक्षाचालक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. याकरिता महिला दिनी घणसोली डी – मार्ट ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान महिलांना रिक्षातून मोफत प्रवास दिला जाणार आहे. यामध्ये महिला चालकांच्या अबोलीसह 50 हून अधिक रिक्षांचा समावेश आहे. आदर्श सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने महिला दिनी महिलांना रिक्षाने मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आली आहे.

घणसोली डीमार्ट ते रेल्वे स्थानक या मार्गावर महिलांना ही सुविधा मिळणार आहे. त्याकरिता या उपक्रमात संघटनेशी संलग्न असलेल्या 50 रिक्षा सहभागी होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी सांगितले, तर महिला चालक असलेली अबोली रिक्षादेखील या उपक्रमात सहभागी असणार आहे. समाजाच्या विकासात महिलांचे योगदान मोठे आहे. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत, तसेच देशातील अनेक महनीय व्यक्तींना घडवणार्‍या थोर महिलांच्या सन्मानार्थ महिला दिनी रिक्षातून महिलांना मोफत प्रवास दिला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. घणसोली डी मार्ट ते घणसोली रेल्वे स्थानक दरम्यानच्या प्रत्येक थांब्यावरून महिलांना या संघटनेच्या रिक्षांमधून प्रवास करता येणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -