घरमुंबईगिरणी कामगारांच्या घरांचा मार्ग मोकळा!

गिरणी कामगारांच्या घरांचा मार्ग मोकळा!

Subscribe

मुंबईतील ६ गिरण्यांच्या जागेवर १८ हजार घरे,

गिरणी कामगारांच्या हक्काच्या जागेवर १८ हजार घरे बांधण्याचा मार्ग आता राज्य सरकारच्या पातळीवर मोकळा होण्याची चिन्हे आहेत. जवळपास २५ एकर गिरणी कामगारांच्या हक्काची जागा मिळावी म्हणून राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. मुंबईतील सहा गिरण्यांची १८ कोटी रुपयांची देणीही मिळावी म्हणून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. आता केंद्रातील मंजुरीनंतर गिरण्यांच्या जागेवर घरे बांधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबईत झालेल्या १९८२ च्या संपापूर्वी सहा गिण्यातील कामगारांची देणी नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनने दिली नाहीत. त्यामुळे कामगार आयुक्त कार्यालयाने या गिरण्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. परिणामी कामगारांच्या घरांसाठी गिरणीच्या जागेपैकी एक तृतीयांश जमीनीचा हिस्सा मिळण्यासाठी अडचण येत होती. पण राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी एक तृतीयांश जमिनीचा हक्क मिळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची अट शिथिल करावी अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली होती.

- Advertisement -

एनटीसी व्यवस्थापनासोबत चर्चा करून ही कायदेशीर देणी देण्याबाबतचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी नुकत्याच झालेल्या गिरणी कामगार नेत्यांच्या बैठकीत दिले आहे. मुख्यमंत्र्यांकडे एनओसी तसेच गिरण्यांच्या जागेचा विषय मांडणार असल्याचे आश्वासनही जैन यांच्यामार्फत देण्यात आले आहे. सहा गिरण्यांमार्फत जवळपास १८ कोटी रुपयांची देणी आहेत. तर एक तृतीयांश जागेनुसार २४.५ एकर जमीन गिरणी कामगारांच्या घरासाठी मिळणे अपेक्षित आहे. दिल्लीतील क्लेम कमिशनरकडे ही प्रकरणे प्रलंबित आहेत. क्लेम कमिशनरच्या मंजुरीनंतर गिरणी कामगारांच्या घरबांधणीची प्रक्रिया सुरू होईल.

गिरणी कामगारांची घरघर
गिरणी कामगारांकडून सुमारे १ लाख ७५ हजार इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज म्हाडाकडे दाखल झाले आहेत. पण सध्याच्या घरांच्या उपलब्धतेच्या प्रमाणात सर्वच गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांना घर उपलब्ध होणे शक्य नाही. मुंबईतील सहा गिरण्यांच्या जागेत १८ हजार घरांची निर्मिती होऊ शकते. तर बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास या गिरण्यांच्या जागेत ४ हजार घरे तयार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फतची ८ हजार घरे बांधून तयार आहेत. तर म्हाडाकडे गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्याची जबाबदारी आहे. म्हाडाकडून ठाणे तसेच रायगड जिल्हाधिकार्‍यांना गिरणी कामगारांच्या घराच्या उपलब्धततेसाठी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. याआधी २०१० मध्ये गिरणी कामगारांसाठी म्हाडाकडून काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये ११०० लाभार्थींना घर उपलब्ध झाले.

- Advertisement -

या गिरण्यांची देणी शिल्लक
१ जानेवारी १९८२ च्या आधीच बोनसच्या मुद्यावर संपावर गेलेल्या गिरण्यांमध्ये एकूण सात गिरण्यांचा समावेश आहे.

१)इंडिया युनायटेड ४,                                                                                                      २)राम मिल,                                                                                                            ३)मधूसुदन मिल,                                                                                                      ४)सीताराम मिल,                                                                                                            ५)फिनले,                                                                                                                    ६)कोहिनूर मिल १ आणि २                                                                                                ७)मुंबई टेक्सटाईल

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -