घरमुंबईवर्तकनगर पोलीस वसाहतीतील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

वर्तकनगर पोलीस वसाहतीतील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

Subscribe

पोलिसांना मिळणार हक्काचे घर

अहोरात्र राबणार्‍या, नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणार्‍या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हक्काचे सुसज्ज घर मिळाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच म्हाडाच्या माध्यमातून वर्तकनगर पोलीस वसाहतीचा कायापालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हाडा 12 हजार 2 चौरस मीटर जागेवर 2.5 एफएसआय (चटईक्षेत्र) वापरुन बांधकाम करणार आहे. गेली अनेक वर्षे धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन राहत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना म्हाडाच्या योजनेमुळे दिलासा मिळणार आहे.

वर्तकनगर परिसरातील धोकादायक स्थितीतील जुने बांधकाम पाडून म्हाडा वर्तकनगरमध्ये 1560 घरांची सुसज्ज वसाहत बांधणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 10 इमारतींची देखभाल व दुरुस्तीचे देयक व त्यावरील व्याज तसेच ठामपाकडे भरावयाचे विकास शुल्क आणि पुनर्विकासामध्ये अतिरिक्त चटईक्षेत्र म्हाडाकडे भरावयाचे अधिमूल्य पोलीस विभागाने भरण्याची आवश्यकता नाही. हे सर्व शुल्क विचारात घेऊन पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येईल. ज्यामध्ये या वसाहतीतील 560 घरे एकही पैसा न घेता आधीपासून वर्तकनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पोलिसांना देण्याचा निर्णय झाला आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी 5 नोव्हेंबरला वर्तकनगर पोलीस वसाहतीला भेट दिली होती. पोलीस वसाहतीची दुरवस्था बघून आणि पोलिसांच्या कुटुंबाशी चर्चा करुन नव्या वसाहतीच्या योजनेबाबत विचार सुरू झाला आणि आता लवकरच ही योजना अंमलात येणार आहे.

- Advertisement -

पोलीस विभागाला उपलब्ध होणार्‍या सदनिका

44.5 चटई क्षेत्रफळ असणार्‍या 40 सदनिका सध्या अस्तित्वात आहेत. त्याऐवजी 45 चौ.मी. चटईक्षेत्र असलेल्या 40 सदनिका विनामूल्य उपलब्ध करण्यात येतील. ज्यामधील चार सदनिका खाजगी व्यक्तींना वितरीत कराव्या लागणार आहेत. 33.89 चौ.मी.चटई क्षेत्रफळ असणार्‍या 120 सदनिका सध्या अस्तित्वात आहेत. त्याऐवजी 45 चौ.मी.चटई क्षेत्रफळाच्या 120 सदनिका विनामूल्य वितरीत करण्यात येणार आहेत. 14.55 चौ.मीटरच्या 400 सदनिका सध्या अस्तित्वात आहेत. त्याऐवजी 30 चौ.मी.क्षेत्राच्या 400 सदनिका उपलब्ध करून देण्यात येतील. पोलीस विभागाकरिता वरीलप्रमाणे 560 सदनिकाचे बांधकाम क्षेत्र वजा जाता उर्वरित क्षेत्रावर म्हाडामार्फत 1000 सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्या बाजारभावाप्रमाणे विक्रीस उपलब्ध असतील. या सदनिकांची विक्री करतानाही पोलिसांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे म्हाडाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -