घरमुंबईउल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राची केली निर्घृण हत्या

उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राची केली निर्घृण हत्या

Subscribe

दोन मित्रांनी किरकोळ कारणावरून भांडण झाल्यामुळे मित्रांची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून खून का केला आहे याची चौकशी सुरू आहे.

किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात दोन मित्रांनी त्यांच्या मित्राची निघृन हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उल्हासनरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दित घडली आहे. आरोपीमध्ये एका तडिपाराचा समावेश असून पोलिसांनी काही तासातच भिवंडी मधील लॉजमध्ये लपून बसलेल्या दोघांवर झडप घातली आहे. हत्या करण्यात आलेल्या त्या तरुणाचे नाव दिनेश साधूराम शर्मा(वय ३०) असून तो कॅम्प नं. ५ येथील प्रेमनगर टेकडी परिसरात राहत होता.

- Advertisement -

नक्की काय घडले?

शर्मा कुटूंबियांना जीन्सचा कारखाना असून शनिवारी कारखान्यात सुट्टी असल्याने दिनेश हा घरी होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दिनेश याला त्याचा मित्र आशिष करीरा याचा फोन आला. त्याने त्याला बियरची बाटली घेऊन कॅम्प नं. ४ येथील कॅनरा बँकेच्या पाठीमागे येण्यास सांगितले होते. दिनेश हा त्या ठिकाणी गेला असता तिथे आशिष आणि सागर ठाकूर हे त्याचे दोन मित्र उभे होते. त्यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून बोलाचाली होऊन भांडण झाले. आशिषयाने लोखंडी पत्रा दिनेशच्या डोक्यात मारला. सागर ठाकूर याने लाकडी दांडक्याने दिनेश याच्या डोक्यावर हल्ला केल्याने दिनेश हा जागीच कोसळला.


हेही वाचासर्पदंशाने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

- Advertisement -

सागर आणि आशिष यांनी त्या ठिकाणाहून पळ काढल्यावर विठ्ठलवाडी पोलिसांनी धाव घेऊन जखमी दिनेश याला उपचारासाठी मध्यवर्ती रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेप्रकरणी मनोज शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आशिष करीरा आणि सागर ठाकूर या दोघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फरार झालेले आशिष आणि सागर हे दोघेही भिवंडी येथील एका लॉजमध्ये लपून बसले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिस नाईक राहुल काळे, पथवे, चित्ते, रोहित बुधवंत, पोलिस कॉन्स्टेबल राख आणि चव्हाण यांनी भिवंडी येथून आशिष आणि सागर या दोघांनाही झडप घालून ताब्यात घेऊन अटक केली.

दिनेश याची हत्या का केली? याची चौकशी पोलिसांनी त्यांच्याकडे सुरू केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत. या गुन्हयातील आशिष करीरा याच्यावर हिललाईन पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती. त्या हद्दपारीचे उल्लंघन करून तो पुन्हा शहरात मित्रांना भेटण्यासाठी आला होता. त्यातच त्याने आपला मित्र दिनेश याची हत्या केले असल्याचे तपासात पोलिसांना समजले आहे.


हेही वाचासायन – पनवेल महामार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -