मधमाशी मित्र योजना कशी सफल होणार?

बोरिवली येथे नुकताच एका ५५ वर्षाच्या व्यक्तीचा मधमाशांच्या हल्यानंतर मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारला जाग आली असून त्यांनी घराच्या छपरावर किंवा स्थानिक आवारात असलेले या मधमाशांच्या पोळ्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

honey-bees
प्रातिनिधिक फोटो

बोरिवली येथे नुकताच एका ५५ वर्षाच्या व्यक्तीचा मधमाशांच्या हल्यानंतर मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारला जाग आली असून त्यांनी घराच्या छपरावर किंवा स्थानिक आवारात असलेले या मधमाशांच्या पोळ्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर पक्षी मित्र, सर्प मित्र या नंतर आता मधमाशी मित्र ही एक नवीन संकल्पना लवकरच राबण्यात येणार आहे. एकीकडे नागरिकांच्या सुरक्षेदृष्टीने प्रशासनाचा हा निर्णय योग्य आहे यात काहीच शंका नाही मात्र दुसरीकडे प्रत्यक्षात ही उपाययोजना कितपत यशस्वी ठरेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे मधमाशी मित्र रहिवाशी ठिकाणांवर असलेले मधमाशांच्या स्थलांतरासाठी मदत करणार आहे. याकरीता काही स्वयंसेवकांना एक विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देऊन हा उपक्रम राबिण्यात येणार आहे. मात्र हे करताना या स्वयंसेवकांना आणि नागरिकांना अनेक अडचणींना समोर जावं लागणार आहे ज्याचं देखील विचार करणे गरजेचं आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर काही तज्ञ लोकांनी मात्र शंका व्यक्त केली आहे.

मधमाशांच्या पोळ्यामध्ये सर्वात मोठी भूमिका बजावते ती म्हणजे राणी माशी. जिथे ही राणी माशी जाते तेथे बाकीच्या मधमाशा जातात. मात्र पोळ्यातील राणी माशी कोणती हेच ओळखणे थोडे अवघड आहे. या सोबतच ही राणीमाशी पोळ्यात सर्वात खोलमध्ये जाऊन बसलेलीअसते. तिला बाहेर काढण्यासाठी आधी वरच्या मधमाशांच्या थराला हलवणे गरजेचे आहे. ते हलवल्यावर या मधमशी मित्र आणि नागरिकांच्या सुरक्षेचादेखील विचार करणे गरजेचे आहे. कारण यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची शक्यता जाणकार्‍यांकडून व्यक्त केली आहे.

या सोबतच मधमाशांच्या स्थलांतराच्या अगोदर इतर अनेक घडामोडींचा देखील आढावा घेणे गरजेचे आहे. ज्यात हवामानाची स्थिती, तेथील तापमान, त्या जागेवर कोणकोणत्या प्रकारचे फुले उपलब्ध आहेत, अशा अनेक गोष्टींचा विचार व्हायला हवा. जर का सरकारचा हा निर्णय चुकला तर अनेक मधमाश्या मरतील याच काहीच शंका नाही.

आईनस्टाइन काय म्हणतात…

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन यांनी सुद्धा मधमाश्यांबाबत सिद्धांत मांडला असून मधमाश्या जगात नसतील तर जास्तीत जास्त फक्त ४ वर्ष माणूस जगू शकेल असे सांगितले आहे.

मुंबईत सध्या पाच वेगवेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशांच्या प्रजाती पाहायला मिळतात.ज्यात रॉक बी, इंडियन हाईव्ह बी, युरोपियन बी आणि स्टिंगलेस बी यांचा समावेश आहे. मुंबईत सुरु असलेल्या काँक्रिटीकरण आणि मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्यामुळे मधमाशांच्या पोळी मुंबईतील अनेक उद्याने आणि इमारतीच्या छतावर पाहायला मिळत आहेत.

नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सरकारचा हा निर्णय योग्य आहे. मात्र हा निर्णय किती यशस्वी ठरेल याबाबत मला शंका वाटते कारण मधमाशांच्या स्थलांतर करणे खूप अवघड आहे.
– डॉ. शांतज देशभ्रातार, प्राणी शास्त्र विभाग प्रमुख,भवन्स कॉलेज(चौपाटी)