घरमुंबई'१३ वर्षाची लढाई जिंकूनही हरले' बार

‘१३ वर्षाची लढाई जिंकूनही हरले’ बार

Subscribe

'१३ वर्षाची लढाई जिंकूनही हरले' अशी अवस्था सध्या मुंबईतील डान्स बार मालकाची झाली आहे, सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवून एक महिना झाला. मात्र काही जाचक अटींमुळे बार मालकांनी अद्यापही पोलीस परवाना मिळवण्यासाठी एकही अर्ज केला नसल्याचे पोलीसांनी सांगितले.

‘१३ वर्षाची लढाई जिंकूनही हरले’ अशी अवस्था सध्या मुंबईतील डान्स बार मालकाची झाली आहे, सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवून एक महिना झाला. मात्र काही जाचक अटींमुळे बार मालकांनी अद्यापही पोलीस परवाना मिळवण्यासाठी एकही अर्ज केला नसल्याचे पोलीसांनी सांगितले. यापुढे मुंबईत डान्सबार हा शब्द इतिहास जमा होतो की काय, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे. राज्य शासनाने २००५ मध्ये राज्यातील डान्स बारवर बंदी आणली होती. डान्स बार मालक-चालक संघटनेने शासनच्या या निर्णयाविरोधात न्यायाल्याचे दार ठोठावले होते. १३ वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारनं घातलेल्या जाचक अटी सर्वोच्च न्यायालयानं रद्द करून मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य शहरांत डान्स बार पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा करून दिला.

मुंबईत पोलिसांकडे अजूनपर्यंत डान्सबार परवाना साठी एकही अर्ज आलेला नसून अर्ज का नाही आले यामागचे कारण माहित नाही.
– सचिन पाटील, पोलीस उपायुक्त (पोलीस मुख्यालय १)

- Advertisement -

महिनाभरापूर्वी दिलेला निर्णय

मात्र राज्य सरकारची वेळेबाबतची अट न्यायालयानं मान्य करून सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरा या वेळेतच डान्स बार सुरू ठेवता येणार आहेत. तसेच डान्स बारमध्ये पैशाच्या वापराबाबतही स्पष्ट निर्देश देण्यात आले. बारबालांना ‘टीप’ देता येणार असली तरी त्यांच्यावर पैसे उडवण्यावर बंदी असेल, असं न्यायालयानं स्पष्ट केले होते. महिन्याभरापूर्वी न्यायालयाच्या या निर्णयाचे डान्स बार संघटनेने स्वागत करून आनंद साजरा करण्यात आला होता. परंतू डान्सबार सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने घातललेल्या अटींमुळे डान्सबार सुरू करायचे का नाही या विवंचनेत डान्स बार मालक सापडला आहे.

डान्स बार परवान्यासाठी अर्ज नाही 

त्यामुळे अद्याप एकाही डान्स बार मालकाची डान्स बार सुरु करण्यासही इच्छा नसल्यामुळे त्यांनी महिना उलटूनही मुंबई पोलिसांकडे डान्स बार परवानासाठी एकही अर्ज केलेला नाही. याबाबत संबंधित पोलीस अधिकारी यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत दुजोरा देऊन आमच्याकडे अद्याप एकही डान्स बार मालकाचे अर्ज आलेला नसल्याचे त्यांनी ‘आपल महानगरशी’शी बालताना सांगितले आहे. या बाबत काही डान्स बार मालकांशी चर्चा केली असता ‘आम्ही १३ वर्षाची लढाई जरी जिंकलो असलो, मात्र त्यातही आमचीच हार झाली’ कारण वेळेचं बंधन इतर काही जाचक अटीमुळे डान्स बार चालू शकत नाही, असे चेंबूर येथील बार मालक विजयअण्णा शेट्टी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

डान्स बार चालवणे म्हणजे तारेवरची कसरत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, मात्र डान्सबारला परवानासाठी लावण्यात आलेल्या अटीमुळे बार कसा चालवायचा हा प्रश्न पडला आहे. डान्सबार चालवणे म्हणजे तारेवरची कसरत आहे, त्यामुळे डान्स बार सुरु करायचा का नाही, या विवंचनेत आम्ही सापडलो असून त्यामुळे आम्ही अजून मुंबई पोलिसांकडे परवानासाठी अर्ज केला नसल्याचे सांताक्रूझ येथील बार मालक आनंद शेट्टी याचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -