घरमुंबईरत्नागिरीत वीजेच्या भूमीगत केबलसाठी तीन कोटींचा निधी

रत्नागिरीत वीजेच्या भूमीगत केबलसाठी तीन कोटींचा निधी

Subscribe

निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्याला फटका बसला असून, अजूनही तिथली परिस्थिती सुधारलेली नाही. या निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात विजेचे खांब तुटून पडले आहेत. याचमुळे आता निसर्ग चक्रीवादळानंतर राज्यातल्या किनारपट्टीवरील भागात भूमीगत वीजेच्या केबल टाकण्यास सुरवात झाली असून, रत्नागिरीमध्ये सुमारे तीन भूमीगत वीजेच्या वायर टाकण्यासाठी तीन कोटी ८२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात वीजेचे खांब उन्मळून प्रचंड नुकसान झाले. मोठ्या प्रमाणावर सुपारी, आंबे व फळबागा नष्ट झाल्या. त्यामुळे जागतिक बँकेच्या सहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात अंतर्गत ३९७ कोटी ९७ लाख रुपयांची कामे किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत समुद्रकिनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील सातपाटीमध्ये भूमीगत वीजेच्या केबलसाठी २०३ कोटी कोटी ७७ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहे.

- Advertisement -

भविष्यातील नैसर्गिक संकटे लक्षात घेऊन अतिरिक्त भूमीगत विद्युत वाहिन्यांची कामे करण्यासाठी ३९० कोटी रुपयांच्या खर्चात तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत मालवणमध्ये ९० कोटी, अलिबागमध्ये २५ कोटी, रत्नागिरी २०० कोटी आमि सातपाटीसाठी ३५ कोटी रुपयांच्या कामांना वाढवण्यास तत्वतः मान्यता दिली आहे.

हेही वाचा –

मुंबईत पावसाची रिपरिप सुरू; अलर्ट मात्र टळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -