घरताज्या घडामोडीमहापालिकेचे कंगनाकडे लक्ष, हाडे मोडणार्‍या खड्ड्यांकडे दुर्लक्ष!

महापालिकेचे कंगनाकडे लक्ष, हाडे मोडणार्‍या खड्ड्यांकडे दुर्लक्ष!

Subscribe

प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट कर्मचार्‍यांना स्वत:च रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याचे काम करावे लागत आहे.

कोरोनाशी दोन हात करत गेल्या सहा महिन्यापासून बेस्टच्या बसेस मुंबईकरांची वाहतूक सेवा करत आहेत. मात्र मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे बेस्ट बसेसचा प्रवास मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरत आहे. तसेच बेस्टच्या बसेसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट कर्मचार्‍यांना स्वत:च रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याचे काम करावे लागत आहे. मात्र याकडे लक्ष न देता मुंबई महानगरपालिका अभिनेत्री कंगना रानौतकडे लक्ष देण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे, असा टोला बेस्ट समितीचे वरिष्ठ सदस्य सुनील गणाचार्य यांनी दैनिक ‘आपलं महानर’शी बोलताना मुंबई महानगर पालिकाला लागवला आहे.

बेस्ट कामगार बुजवतात खड्डे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई आणि उपनगरात बेस्टच्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. आता अनलॉकची सुरुवात झाली आहे. बेस्ट बसेसची प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बेस्टचा बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले आहेत. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रवाशांची हाडे मोडण्याची वेळ आली आहे. अनेकांना पाठदुखी, खांदेदुखी, मणक्याचे दुखणे सुरु झाले आहे. त्याचबरोबर बेस्टच्या बसेसचे नुकसान होत आहे. मात्र मुंबई महानगर पालिका खड्डे बुजविण्यात रस दाखवत नाही. त्यामुळे परिस्थितीचे भान ठेवून महापालिकाचे काम स्वत: बेस्टचे विक्रोळी डेपोचे चालक वाहक करताना दिसून येत आहेत. अमरनगरहून खिंडीपाडाकडे जाताना चढणाला मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे बसला झटका लागत होता व प्रवाशांनासुध्दा त्रास होत होता. त्यामुळे बस चालक तात्या निकम आणि श्रीधर नारकर यांनी परिस्थितीचे भान ठेवत हा खड्डा बुजवला आहे. तसेच बेस्ट कर्मचारी अशा प्रकाराचे मोठे खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. दरवर्षी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करुन रस्ते दुरुस्ती केली जाते. मात्र प्रत्येक वर्षी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे पावसाच्या पाण्याने उघडे पडतात. यासंबंधीत अनेकदा तक्रारी करुन मुंबई महानगर पालिका लक्ष देत नसल्याने बेस्ट कर्मचार्‍यांवर स्वत: खड्डे बुजविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकांच्या कार्यपध्दतीवर आज प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- Advertisement -

आतातरी मुंबईकरांचा विचार करा…?

मुंबई महानगरपालिका ही मूळ संस्था असताना रस्त्यावरचे खड्डे बुजविणे हे त्यांचे प्राथमिक काम आहे, असे असतानासुध्दा बेस्टचा कामगारांना आपल्या प्रवाशांची काळजी घेण्यासाठी रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे काम करत आहे. ही घटना मुंबई महानगर पालिकेसाठी नामुष्कीची घटना आहे. मुंबई महानगर पालिका आपले स्वत:चे कर्तव्य सोडून चित्रपट अभिनेत्री कंगना रानौतचे कार्यालय पाडण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे. पंरतु जी प्राथमिक गरज आहे, त्याकडे लक्ष द्यायला महापालिकेला वेळ नाही. महानगरपालिका प्रशासनाने या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे. आतातरी मुंबईकरांचा विचार करत तात्काळ खड्डे बुजविण्याच्या कामाला पालिका प्रशासनाने गती द्यावी, अशी प्रतिक्रिया बेस्ट समितीचे वरिष्ठ सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली.

महानगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांचे मुंबईकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे बेस्ट कामगारांना आपल्या बसेस सुरक्षित ठेवण्याकरीता स्वत: खड्डे बुजवावे लागतात, ही घटना लज्जास्पद आहे.
-जगनारायण कहार, सरचिटणीस, बेस्ट कामगार संघटना
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -