घरमुंबईलघुशंकेसाठी थांबवली गांधीधाम एक्सप्रेस

लघुशंकेसाठी थांबवली गांधीधाम एक्सप्रेस

Subscribe

लघुशंका आल्यामुळे गांधीधामच्या मोटरमनने एक्सप्रेस नालासोपारा आणि वसई दरम्यान थांबवल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

लघुशंका आल्यामुळे गांधीधामच्या मोटरमनने एक्सप्रेस नालासोपारा आणि वसई दरम्यान थांबवल्याचा प्रकार सोशल मिडीयावर समोर आला आहे. एक्सप्रेस गाडी अशा प्रकारे थांबवणे रेल्वेच्या नियमात बसते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणे आणि एकूणच प्रवाशांना अपघाताचा धोका निर्माण होतो का? असे प्रश्नही निर्माण झाले आहेत. शिवाय लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा असते. मात्र मोटरमन किंवा लोकोपायलटना अशी नैसर्गिक गरजेची सुविधा का उपलब्ध केली जात नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

वसईच्या दिशेने थांबा घेतला

गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या गांधीधाम एक्सप्रेसने नालासोपारा स्थानक ओलांडल्यानंतर शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास अचानक वेग कमी करून वसईच्या दिशेला थांबा घेतला. त्यानंतर या गाडीचा मोटारमन इंजिन वॅगनमधून खाली उतरला आणि चक्क त्याने रेल्वे रुळाच्या कडेला लघुशंका उरकली. त्यानंतर तो पुन्हा गाडीच्या इंजिन केबिनमध्ये चढत असताना त्यानंतर लगेचच गाडी सुरू झाली.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल

हा प्रकार कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर तो सोशल मीडियावरून व्हायरल केला. त्यामुळे गांधीधामच्या मोटारमनची चांगलीच नाचक्की तर झालीच. त्याचबरोबर त्याने नियम मोडून गाडी मध्येच का थांबवली? याचीही चर्चा केली जात आहे.

नालासोपारा स्थानकात या गाडीला कोणताही सिग्नल नाही. ऑटोमॅटीक सिग्नल मिळाल्यावर गाडी थांबली असेल आणि गाडी थांबली म्हणून मोटरमनने लघुशंका उरकली असावी. त्यात काय एवढे? – आर. के. मीना, नालासोपारा रेल्वेस्थानक अधीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -