घरमुंबई'मुंबईचा राजा'अयोध्येच्या राम मंदिरात होणार विराजमान

‘मुंबईचा राजा’अयोध्येच्या राम मंदिरात होणार विराजमान

Subscribe

यंदा गणेशगलल्लीचा राजा अयोध्येतील 'राम मंदिरात' विराजमान होणार आहे.

यंदा गणेशगलल्लीचा राजा अयोध्येतील राम मंदिरातविराजमान होणार आहे. सध्या भव्य राम मंदिर देखाव्याच्या तयारीसाठी जोरदार धावपळ सुरु असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथला प्रत्येक कार्यकर्ता नेटाने कामाला लागला आहे. सध्या देखावा उभारण्याची लगबग पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने कारागिरी रात्रंदिवस देखाव्याचे काम करण्यात मग्न झाले आहेत. गणेशगलल्लीच्या यंदाच्या देखाव्यासाठी तब्बल ६० कारागिरांची टीम सज्ज झाली आहे. या मंदिराची उंची ६० फूट असून रुंदी ७० फूट असणार आहे. हा देखावा उभारण्यासाठी जोमाने कामाला सुरुवात होत असल्याचे पाहायला मिळत असून येत्या २७ ऑगस्टपर्यंत या देखाव्याचे काम पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे हा देखावा इकोफ्रेंडली असणार असून या देखाव्याकरता संपूर्ण लाकडाचा वापर करण्यात येत आहे.

- Advertisement -

सर्वात उंच गणपतीची मूर्ती असलेले मंडळ म्हणून लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची ओळख आहे. तब्बल २२ फूट गणपतीची मूर्ती हि या मंडळाची खासियत आहे. यंदा या मंडळाचे ९२ वे वर्ष असून दरवर्षी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राचा देखावा साकारत असल्याने यंदा बाप्पा कुठल्या रूपात येईल याची प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिलेली होती. मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक गणेशमंडळातर्फे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीश कुमार आणि त्यांचे सहकारी या मंदिराची प्रतिकृती उभारत आहेत.

आरतीचा मान

मंडळाची खासियत म्हणजे गेली १२ वर्षे बापाच्या आरतीचा मान दरवर्षी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांना देण्यात येतो. यंदा हा मान एनडीआरएफचे पथक, महापाकिकेच्या पाणी खात्यातील कर्मचारी, बीच वॉरिअर्स आणि माथाडी कामगार यांना देण्यात येणार आहेकिरण तावडे; मुंबईचा राजा मंडळाचे अध्यक्ष

गेल्या महिन्याभरापासून कारागीर देखावा उभारण्यासाठी कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे या देखाव्यात रामच्या कथांचे पेंटींग्ज लावण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात येणार असून येत्या ३१ ऑगस्टला बाप्पाचे मुखदर्शन भक्तांना घेता येणार आहे.  स्वप्निल परब; मुंबईचा राजा मंडळाचे सरचिटणीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -