घरमुंबईगणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल झाले उदंड, मूर्तीशाळांकडे भाविक फिरकेनात!

गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल झाले उदंड, मूर्तीशाळांकडे भाविक फिरकेनात!

Subscribe

लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे तीन दिवस आहेत. त्यामुळे गणेश मूर्तीची बुकिंग आणि पुजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारात भक्तांची लगबग सुरू झालीय. मात्र स्टॉलवरील गणेशमूर्तीच्या बुकिंग करण्यासाठी भाविकांचा ओढा वाढल्याने, कारखान्यांकडे भाविकांनी पाठ फिरवली आहे

लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे तीन दिवस आहेत. त्यामुळे गणेश मूर्तीची बुकिंग आणि पुजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारात भक्तांची लगबग सुरू झालीय. मात्र स्टॉलवरील गणेशमूर्तीच्या बुकिंग करण्यासाठी भाविकांचा ओढा वाढल्याने, कारखान्यांकडे भाविकांनी पाठ फिरवली आहे. यंदाच्या वर्षी त्याचा फटका कारखानदारांना चांगलाच बसला आहे. अजूनही ठाणे व कल्याण परिसरातील कारखान्यातील सुमारे 5 हजारांच्या आसपास गणेशमूर्तीची बुकिंग झाली नसल्याने मूर्तीकार चिंतेचे सापडले आहेत.

गेल्या दोन चार वर्षापासून गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल जागोजागी पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आठ- पंधरा दिवसांपासून गणेशमूर्तीच बुकिंग करण्यासाठी स्टॉलवरील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. पेण, हमरापूर येथून गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे गेल्या दोन चार वर्षापासून कारखान्यात जाऊन गणेशमूर्तीचे बुकिंग करण्याचे भाविकांचे प्रमाण हळू हळू कमी झाले आहे. यंदाच्या वर्षी हे प्रमाण खूपच वाढले असून, एका कारखान्यात सुमारे अडीचशे ते तीनशे भाविक कमी झाले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या मागणीनुसार मूर्तीकारांनी बनवलेल्या गणेशमूर्ती बुकिंगविना पडून आहेत.

- Advertisement -

ठाणे शहरात पूर्वी 12 ते 15 कारखाने होते, आता मात्र ही संख्या 25 ते 30 पर्यंत वाढली आहे. मात्र त्याच्या अनेक पटीने गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॉलची संख्या वाढली आहे. ठाणे शहरात जागोजागी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल दिसून येतात. साधारण 1 हजाराच्या आसपास गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल आहे. स्टॉलच्या वाढत्या संख्येमुळे गणेशमूर्तीची किंमतही कमी केली जाते. मूर्तीची कलाकुसर पाहून त्याला किंमत देणारेही भाविक होते. आता मात्र कलेला किंमत नसून केवळ कमी किंमतीतील गणेशमूर्ती खरेदी करण्याकडेच भाविकांचा कल आहे.

महागाईमुळे भाविक मूर्तीची रंगरंगोटी न पाहता केवळ कमी किंमत म्हणून स्टॉलधारकांकडून मूर्ती खरेदी करीत असल्याचे सिध्देश बोरीटकर यांनी सांगितले. ठाण्यातील बोरीटकर कुटूंबातील चौथी पिढी या परंपरागत व्यवसायात आहे. स्टॉलमुळे व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे बोरीटकर कुटूंबांनी सांगितले. कल्याण शहरातही याहून वेगळी स्थिती नाही. कल्याणच्या कुंभारवाड्यात गणेशमूर्ती बुकिंगसाठी व खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडायची. स्टॉल संस्कृतीमुळे कुंभारवाड्यातील गर्दीही पूर्वीपेक्षा ओसरली आहे. स्टॉलचा फटका ठाणे आणि कल्याण शहरातच नव्हे तर सर्वच शहरातील मुर्तीकारांना बसला आहे, असे बोरीटकर यांचे म्हणणे आहे. महापालिकेकडून स्टॉलधारकांना परवानगी देताना जुन्या मूर्तीकारांचा प्रधान्याने विचार करावा अशीही मागणी मूर्तीकारांमध्ये होत आहे. गणेशमूर्ती साकारण्यासाठी व्यावसायिकांना जागा अपुरी पडते. प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याची नाराजी व्यवसायिकांकडून होत आहे.

- Advertisement -

गणेशमूर्ती विक्रीच्या वाढत्या स्टॉलमुळे मूर्तीशाळेतून गणेशमूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी कमी झाली आहे. गेल्यावर्षीच्या मागणीनुसार मूर्तीशाळेत गणेशमूर्ती साकारल्या आहेत. आठ पंधरा दिवस अगोदरच गणेशमूर्तींचे बुकिंग होते. मात्र एका कारखान्यातील सुमारे दोनशे ते अडीचशे गणेशमूर्तींचे बुकिंगही झालेले नाही. ठाण्यात साधारण 3 हजाराच्या आसपास गणेशमूर्ती बुकिंग अभावी तशाच पडून आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी खूप मोठा फटका सहन करावा लागणार आहे. पूर्वी गणेशमूर्ती वरील कलाकुसर पाहून त्याला किंमत देणारे भाविक होते. वाढत्या स्टॉलमुळे गणेशमूर्तीची किंमत होऊ लागली. स्टॉलवर मिळेल त्या किंमतीला गणेशमूर्तीची विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे दरवर्षी नव्या स्टॉल धारकांना परवानगी देताना विचार होणे गरजेचे आहे. -अरूण बोरीटकर, ज्येष्ठ मूर्तीकार ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -