घरमुंबईगणेश नाईक आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा

गणेश नाईक आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा

Subscribe

मतदार संघातील गावठाणांमधून झालेला तीव्र विरोध, भाजपसोबत ताणलेले संबंध, राष्ट्रवादीने आनंद परांजपे यांच्या रुपाने दिलेला समर्थ पर्याय आणि वंचित आघाडीचा वाढता प्रभाव यामुळे यंदा ठाणे लोकसभा निवडणूक शिवसेनेला कठीण जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र हे सर्व आडाखे चुकीचे ठरवून विद्यामान खासदार राजन विचारे यांना चार लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळाला. विशेष म्हणजे मीरा-भाईंदरप्रमाणेच ऐरोली आणि बेलापूरमधून शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाल्याने गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला खिंडार पडत चालल्याचे दिसून येत आहे. आता काही महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर पुढील वर्षी एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. या दोन्ही निवडणुकांमध्ये गणेश नाईक आणि राष्ट्रवादी पक्षापुढे शिवसेना-भाजप युतीचे मोठे आव्हान असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युतीचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आनंद परांजपे यांच्यासह २३ उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यातच मुख्य लढत होती. मात्र राजन विचारे यांनी अगदी सहज विजय मिळविला. निवडणुकीच्या काही दिवस आधी गठीत झालेल्या वंचित आघाडीचीही चर्चा होती. मात्र ठाणे लोकसभा मतदार संघात तरी ती निष्पभ्र ठरली आहे.

- Advertisement -

राजन विचारे गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले. ठाण्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील एकाही विभागात आनंद परांजपे यांना मताधिक्य मिळवता आलेले नाही. प्रत्येक क्षेत्रात सेना भाजप युतीने भरघोस मतांची आघाडी घेतली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर या निवडणुकीने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. विधानसभेच्या सहाही जागा युतीसाठी अनुकुल असल्याचे स्पष्ट संकेत लोकसभा निवडणूक निकालाने मिळाले आहेत.

मनसे फॅक्टर प्रभावहीन

ठाणे शहर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही प्रमाणात अस्तित्त्व आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली नसली तरी निवडणुकीच्या दोन दिवस आधी ठाण्यात कार्यकत्र्यांशी चर्चा केली होती. मात्र राज्यातील इतर भागांप्रमाणे मनसे फॅक्टर अजिबात चालला नाही. वंचित आघाडीच्या उमेदवाराला या निवडणुकीत जेमतेम ४७ हजार मते मिळाली असून निवडणुकीच्या निकालावर त्यामुळे कोणताही फरक पडणार नव्हता.

- Advertisement -

विधानसभानिहाय मताधिक्य

मीरा भाईंदर विधानसभा- आनंद परांजपे – ६४ हजार ७२०, विचारे- १ लाख ३३ हजार ९८८
ओवळा-माजीवडा – आनंद परांजपे – ४७ हजार ९९३, राजन विचारे- १ लाख ४० हजार ७११
कोपरी पाचपाखाडी – आनंद परांजपे – ४० हजार ९६७, राजन विचारे- १ लाख २२ हजार ३१६
ठाणे – आनंद परांजपे – ४७ हजार ६५५, राजन विचारे १ लाख ३० हजार ७६३
ऐरोली – आनंद परांजपे – ६३ हजार ३१३, राजन विचारे १ लाख ७ हजार ६७६
बेलापूर – आनंद परांजपे – ६३ हजार ४४०, राजन विचारे १ लाख ३ हजार १६४

ठाणे लोकसभा

एकूण मतदान – ११ लाख ७० हजार ९७०

राजन विचारे (शिवसेना) – ७ लाख ४० हजार ९६९
आनंद परांजपे (राष्ट्रवादी) – ३ लाख २८ हजार ८२४
मल्लिकार्जुन पुजारी (वंचित आघाडी) – ४७ हजार ४३२
नोटा- २० हजार ४२६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -