लोकसभा निवडणुकीनंतर गणेश नाईक शिवसेनेत?

लोकसभा निवडणुकीतून माघार घेणारे गणेश नाईक लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Mumbai
ganesh naik to join shiv sena after lok sabha election
माजी मंत्री गणेश नाईक

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला प्रत्येक जागा महत्त्वाची असताना देखील ठाणे लोकसभा मतदार संघात उभे राहण्याची पक्षश्रेष्ठींनी घातलेली गुळ धुडकावल्याने माजी मंत्री गणेश नाईक आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मध्ये एक दरी निर्माण झाली आहे. तसेच माजी खास आनंद परांजपे यांचे नाव पुढे करुन लोकसभा निवडणुकीतून माघार घेणारे नाईक लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत प्रवेश करतील, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पक्षादेश न ऐकणारा नेता

नवी मुंबईत राजकीयक खेळी सुरु असतानाच नवी मुंबईचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे लक्ष लागून राहिले आहे. खासदार राजन विचारे यांच्या सारख्या तगड्या उमेदवारापुढे नाईक यांना उभे करुन तोंडाशी पाडण्याची राष्ट्रवादीतील काही नेत्यांची व्यहूरचना होती. त्यासाठी पक्षातील सर्व नेत्यांनी नाईक यांनाच उमेदवारी द्या, असा आग्रह देखील धरला होता. पण राष्ट्रवादीतील नेत्यांची चाल ओळखून नाईक यांनी उमेदवारी स्वीकारली नाही. त्यामुळे पक्षादेश न ऐकणारा नेता अशी एक प्रतिमा पक्षात तयार झाली आहे.

परांजपेंना निवडुन आणण्याची जबाबदारी नाईकांची

परांजपे यांना निवडणून आणण्याची जबाबदारी नाईक कुटुंबियांनी घेतली असली तर ती तडीस नेणे कठीण आहे. अशी चर्चा झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत वातावरण ताणलेले असून अशी ताणलेल्या संबंधात राहणे नाईक यांना आता जास्त काळ राहणे शक्य नसल्याने ते लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे.

चौगुले यांचा प्रवेश लांबणीवर

गणेश नाईक यांचे शिवसेनेतील नेत्याबरोबर आजही चांगले संबंध आहेत. नाईक यांचे एकेकाळचे शिष्य विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर अनेक चांगले संबंध आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय चौगुले देखील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता होती. मात्र शिवसेना आणि भाजपाच्या युतीनंतर चौगुले यांचा प्रवेश करण्याचे लांबणीवर पडला आहे.


वाचा – ठाणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून गणेश नाईक रिंगणात उतरणार!

वाचा – गणेश नाईकांना लोकसभेसाठी उतरवण्याची राष्ट्रवादीची रणनीती


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here