घरमुंबईचिकन,मटण, बिर्यानीसाठी अबू सालेमचा हट्ट

चिकन,मटण, बिर्यानीसाठी अबू सालेमचा हट्ट

Subscribe

तळोजा कारागृहात असलेला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेस हा चिकन, मटण, बिर्याणी यांची मागणी करत आहे. त्याला ते मिळत नसल्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ होऊन हातपाय आपटत आहे. जेलच्या भिंतीवर बुक्क्या मारत आहे. महाराष्ट्रात कैद्यांना केवळ शाकाहार देण्याचा नियम आहे.

तळोजा कारागृहात असलेला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेस हा चिकन, मटण, बिर्याणी यांची मागणी करत आहे. त्याला ते मिळत नसल्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ होऊन हातपाय आपटत आहे. जेलच्या भिंतीवर बुक्क्या मारत आहे. महाराष्ट्रात कैद्यांना केवळ शाकाहार देण्याचा नियम आहे. पण सालेमला नियमित मांसाहार हवा आहे. त्याला तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी अजून बारा वर्षे लागतील. तुरुंगातून बाहेर पडू त्यावेळी आपली शरीरयष्टी चांगली असावी, असे त्याला वाटते. त्यासाठी तो नियमित व्यायाम करतो. पण व्यायाम केल्यावर त्याला हवा असलेला मसाज आणि पसंतीचा मांसाहार मिळत नसल्यामुळे सालेम अस्वस्थ झालेला आहे. त्यामुळेच तुरूंगात आपले हाल होत आहेत, अशा तक्रारी तो करत आहे.

भायखळा जेलमध्ये असलेल्या कैद्यांना खाण्यातून विषबाधा झाल्याची बाब उघड आली आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अबू सालेमच्या पोटातही गोळा आला आहे. सालेमला तर त्याच्या पसंतीचा मांसाहार हवा आहे. यावर तळोजा जेल अधीक्षक सदानंद गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता, या कारागृहात कैद्यांना देण्यात येणारे जेवण हे तपासूनच देण्यात येते असे सांगितले. प्रत्येक राज्यात कैद्यांना विविध प्रकारचे जेवण देण्यात येते. काही ठिकाणी मांसाहारी तर काही ठिकाणी शाकाहारी देण्यात येते. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जेलमध्ये कैद्यांना मांसाहारी जेवण देण्यात येत नाही. अनेक कैद्यांची मागणी असते, पण कायद्यात तशी तरतूद नसल्याने आम्हाला ते देता येत नाही.

- Advertisement -

वर्षातून ५ वेळा कैद्यांना मांसाहारी जेवण देण्याची तरतूद आहे. त्यासाठी त्यांच्याकडून त्याचे पैसे घेतले जातात, असे यावेळी गायकवाड यांनी सांगितले. तळोजा मध्यवर्ती कारागृहात एकूण २९०० कैदी असून सर्वांना खाण्याबाबत एकच नियम लागू आहे. यात कोणताही भेदभाव केला जात नाही. राजेशाही थाटात वागणार्‍या सालेमला अनेक सुविधा मिळत नसल्याने त्याने या संबधीची तक्रार थेट पोर्तुगाल सरकारकडे केली होती. त्याच्या तक्रारीवरून पोर्तुगालमधील सालेमची वकील सबा कुरेशी भारतात आली होती.

सालेमने तिच्यासमोर तक्रारींचा पाडाच वाचला. यावर अबू सालेमची सुरक्षा धोक्यात आहे, अशी चर्चा सर्वत्र पसरली होती. यात काही तथ्य नसल्याने कुरेशी यांना परत जावे लागले. यापूर्वीही आर्थर रोड जेलमध्ये अबू सालेमवर हल्ला झाला होता. गँगस्टर मुस्तफा डोसाने त्याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर सालेमला तळोजा जेलमध्ये हलवण्यात आले होते. या ठिकाणीही गँगस्टर संतोष शेट्टी टोळीचा गुंड देवेंद्र जगताप याने सालेमवर गोळी झाडली. जगताप हा शाहीद आझमी यांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटकेत आहे. काही आठवड्यापूर्वी खंडणीच्या रकमेवरून सालेम आणि जगतापमध्ये बाचाबाची झाली होती.कुख्यात गँगस्टर छोटा राजनच्या टोळीत काम करतानाही सालेम आणि जगताप यांच्यातील संबंध ताणले गेले होते.त्यानंतर तळोजा जेल अधिकारी भास्कर कचरे यांच्यावर ऑक्टोबर २०१२ मध्ये प्राणघातक हल्ला झाला होता.

- Advertisement -

कारागृहातील इतर कैद्यांप्रमाणे सालेमला वागणूक दिली जाते. आपल्याला विशेेष सुुविधा मिळाव्यात, अशी मागणी तो बरेच वेळा करतो. त्या न दिल्यामुळे तो आपले हाल होत असल्याच्या तक्रारी करतो. त्याच्या वकिलाला त्या तक्रारीत तथ्य आढळले नाही. तो मुख्य आरोपी असल्याने त्याच्यावर आमची करडी नजर आहे. काही कर्मचारी दहशतीपोटी त्याच्या मर्जीनुसार वागतही असतील. कुठे कुठे लक्ष ठेवणार ? आम्ही आमच्या वतीने जेलची सुरक्षा सक्षम ठेवण्याचा प्रयत्न करतो.
– सदानंद गायकवाड, अधीक्षक, तळोजा जेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -