घरमुंबईअंडरवर्ल्डमध्ये गुरु साटम पुन्हा सक्रिय

अंडरवर्ल्डमध्ये गुरु साटम पुन्हा सक्रिय

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा एकेकाळचा जवळचा सहकारी अंडरवर्ल्ड डॉन गुरु साटम हा गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा एकेकाळचा जवळचा सहकारी अंडरवर्ल्ड डॉन गुरु साटम हा गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. तब्बल चार वर्षांनी गुरु साटम टोळीशी संबंधित पाच गुंडांना गुरुवारी खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या पाचही गुंडांकडून पोलिसांकडून घातक शस्त्रांसह जप्त केला आहे.

शहरातील एका बिल्डरकडून 60 लाख रुपयांची खंडणीची रक्कम उकाळूनही त्याला पुन्हा पुन्हा खंडणीसाठी धमकी दिल्याचा या पाचजणांवर आरोप आहे. खंडणी देण्यास नकार देणार्‍या दोघांवर येत्या काही दिवसांत गोळीबार करण्याचे आदेशच त्याने संबंधित पाचही गुंडांना दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या पाचजणांच्या अटकेने गुरु साटमविषयी व त्याच्या कारवायांबाबत जास्तीत जास्त माहिती काढण्याचा आता पोलीस प्रयत्न करीत आहेत. दरम्यान खंडणीच्या याच गुन्ह्यांत गुरु साटमला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून तो दक्षिण आफ्रिकेतून स्वतची टोळी चालवित असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने बोलताना सांगितले. गेल्या काही वर्षांपासून शहरातील एका नामांकित बिल्डरला गुरु साटमकडून खंडणीसाठी धमक्या येत होत्या.

- Advertisement -

यापूर्वी त्यांच्यावर खंडणीच्याच वादातून गुंड टोळ्याकडून गोळीबार झाला होता. या गोळीबारानंतर ते प्रचंड भयभीत झाले होते. त्यामुळे गुरु साटमकडून खंडणीसाठी धमकी आल्यानंतर त्यांनी त्याच्या सहकार्‍यांना सुमारे 60 लाख रुपयांची खंडणीची रक्कम पाठवून दिली होती. तरीही त्यांना काही दिवसांपासून पुन्हा खंडणीसाठी धमकाविण्यात येत होते. या धमकीनंतर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविला होता. हा गुन्हा हाती येताच या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून गुरु साटमच्या पाच साथीदारांना अटक केली. या आरोपींकडून पेालिसांनी दोन बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, अकरा मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहे.

यातील अमोल विचारे याने एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या केली होती. याच गुन्ह्यांत दहा वर्षांची शिक्षा भोगून तो अलीकडेच बाहेर आला होता. भरतने गुरु साटमच्या आदेशावरुन शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिली होती. राजेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 50 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. बिपीन हा गुरु साटमचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असून त्याने विदेशात त्याला खंडणीची रक्कम पाठविली होती. दिपक हा बांधकाम व्यावसायिकांची माहिती काढून गुरु साटम व त्याच्या सहकार्‍यांना देण्याचे काम करीत होते. या पाचजणांनी दोन बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्याची योजना बनविली होती. मात्र ते दोघेही पकडले गेल्याने त्याची ही योजना फसली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -