गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकांकडून ४ लाखाचा गांजा जप्त

उल्हासनगर येथील कुख्यात गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकांकडून ८ किलोचा गांजा जप्त करण्यात आला असून आरोपी रोहिदास गाडगे यांना अटक करण्यात आले.

Mumbai
Gangster Ravi Pujari aide held, drugs worth Rs 2.55 lakh seized from him
४ लाखाचा गांजा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी धडक कारवाई करून कुख्यात गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकांकडून ८ किलोचा गांजा जप्त केला आहे. या गांज्याची बाजारात २ लाख ५५ हजार किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचपाडा परिसरात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रोहिदास गाडगे (४६) यांना अटक करण्यात आली आहे.

अशी करण्यात आली धडक कारवाई

उल्हासनगर येथील प्रकाश शेठ यांच्या वीटभट्टी जवळ, गायरान परिसरात रोहिदास गाडगे (४६) हा इसम गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांना मिळाली होती. त्या माहितीवरून त्यांनी आपल्या पथकासह त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी रोहिदास तेथे संशयास्पद रित्या फिरत होता. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ निळया रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ८ किलो गांजा मिळून आला आहे. त्याच्याकडून त्या गांजासह १ मोबाईलफोन आणि रोख रक्कम असा २ लाख ५७ हजार रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

रोहिदास गांजा आपल्या कब्जात बाळगून तो उल्हासनगर आणि कल्याण परिसरात त्याची विक्री करणार होता. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ही माहिती समोर आली आहे. रवि पुजारी कंपनीत काम करणारा आणि त्याच्यावर मुंबई युनिट ७ येथे ४ खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमीक माहिती पोलिसांना समजली आहे. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात रोहिदास गाडगे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास अमली पदार्थ विरोध पथकाचे धुमाळ करीत आहेत.


वाचा – विदेशी चलन लुटणार्‍या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

वाचा – भिवंडीतून 2 किलो गांजा जप्त


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here