घरमुंबईपूरग्रस्तांसाठी जाणार मुंबईतून मोफत 'बाप्पा'!

पूरग्रस्तांसाठी जाणार मुंबईतून मोफत ‘बाप्पा’!

Subscribe

पुरामुळे सध्या कोल्हापुरात घरांप्रमाणे तेथील गणपती मूर्ती शाळांचेही नुकसान झाले आहे. मूर्तीशाळा प्रमुख सचिन शेट्टी यांनी कोल्हापूरच्या ग्रामीण भागात मूर्ती मोफत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

महापूरामुळे कोल्हापूर असेल किंवा सांगली, या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे या दोन्ही शहरात ऐन सणासुदीच्या काळात होत्याचे नव्हते झाले. मात्र या पुरग्रस्तांना मदत करत आहेत त्या विविध सामाजिक संस्था. कुणी कपडे, कुणी अन्नधान्य तर कुणी इतर सेवा-सुविधा पुरवून पुरग्रस्तांना मदत करत आहेत. पण आता याच पुरग्र्स्तांच्या मदतीसाठी परळ येथील सचिन शेट्टे यांची बाप्पाची मूर्तीशाळा धावून आली आहे. २ सप्टेबरला आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत असून, सगळीकडे सध्या बाप्पाच्या मूर्ती बनवण्याची लगबग तर काही घरांमध्ये सध्या बाप्पाच्या तयारीची लगबग सुरू आहे. मात्र गणपती तोंडावर असताना आलेल्या पुरामुळे सध्या कोल्हापुरात घरांप्रमाणे तेथील गणपती मूर्ती शाळांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या ग्रामीण भागात ज्यांच्या घरी बाप्पा विराजमान होतो त्यांच्या घरी आता मुंबईतून बाप्पाची मूर्ती पाठवण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि मूर्तीशाळा प्रमुख सचिन शेट्टी यांनी कोल्हापूरच्या ग्रामीण भागात मूर्ती मोफत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

पूराचा फटका तेथील कारखान्यांना बसला असून, सर्वच स्थरातून मदतीचे हात हे पूरग्रस्तांना मिळत आहेत. त्यामुळे आम्ही देखील आमच्या इथल्या बाप्पाच्या मूर्ती या मोफत कोल्हापूरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

– सचिन शेट्टे, कार्यशाळा प्रमुख, परळ

ganapati
सचिन शेट्टे, कार्यशाळा प्रमुख

कोल्हापूरमध्ये पाठवणार १०० हून अधिक बाप्पाच्या मूर्ती

पूरामुळे कोल्हापूरमधील ७० हून अधिक बाप्पाची मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांचे नुकसान झाले असून, याचा थेट फटका आता कोल्हापूरमध्ये ज्यांच्या घरात बाप्पाचे आगमन त्यांना बसला आहे. त्यामुळेच १०० हून अधिक मूर्ती भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरात पाठवणार असल्याचे सचिन शेट्टे यांनी सांगितले. तसचे या मूर्तीसोबत पूजेचे साहित्यही पाठवण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सचिन शेट्टी यांनी मागील चार दिवसापासून आपल्या मूर्ती शाळेतून बाप्पाच्या मूर्तीची विक्री थांबवली असून, आता उरलेल्या १०० हून अधिक बाप्पाच्या मूर्ती या ते कोल्हापूरमध्ये पाठवणार आहेत. दरवर्षी त्यांच्या मूर्ती शाळेमध्ये ५०० बाप्पाच्या मूर्ती या विक्रिसाठी ठेवल्या जातात त्यातील काही मूर्ती या कोकण, कोल्हापूरमध्येही पाठवल्या जातात. मात्र यंदा कोल्हापूरमध्ये पाठवणाऱ्या मूर्ती यांचे पैसे घेतले जाणार नाही असे शेट्टी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -