Live: ‘पुढच्या वर्षी लवकर या!’; आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना!

Mumbai

मुंबई तसेच पुणे, नाशिक राज्यभरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळपासूनच वाजत-गाजत निरोप द्यायला सुरूवात झाली आहे. मुंबई तसेच पुण्यात गणेश भक्तांसह ढोल-पथकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून एकच लगबग दिसून येत आहे. दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कोणताही गैरव्यवहार, गैरप्रकार घडू नये, बाप्पाचे विसर्जन निर्विघ्नपणे व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनासह मुंबई महानगरपालिकाही सज्ज झाली आहे.