घरमुंबई...त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी

…त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी

Subscribe

पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून मुंबईची लाईफ लाइन कोलमडल्याचे प्रकार दरवर्षी घडतात. मात्र यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून रेल्वे आणि पालिकेच्या वतीने पावसाळ्याआधीच रेल्वेच्या मार्गावरील कल्व्हर्ट आणि नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली होती. तसेच ही कामे पूर्ण झाल्याचा दावा देखील रेल्वेच्या वतीने करण्यात आला होता. तरीदेखील मुंबईत पडलेल्या पहिल्या पावसात पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यासोबत मध्य रेल्वेच्यादेखील सफाईचा दावा फोल ठरल्याचे पहायला मिळाले. याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांना पत्रकारांनी विचारले असता रेल्वे रुळावरचा कचरा उचलण्याची जबाबदारी कुणाची असते हे सांगण्याची गरज नाही असे सांगत पालिकेवर अप्रत्यक्ष टीका करत हात झटकल्याचे पहायला मिळाले.

नेमकं काय म्हणाले डी. के. शर्मा 

रेल्वे ट्रॅकवरील कचऱ्यामुळे खूप अडचणी येत आहेत. हा कचरा उचलण्याची जबाबदारी कुणाची आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जर त्यांनी आपली जबाबदारी योग्यरीतीने पार पाडली तर बऱ्यापैकी समस्या सुटतील असा अप्रत्यक्ष टोला शर्मा यांनी पालिकेला लगावला.

- Advertisement -

पहिल्याच पावसात पालिका फुस्स

पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १५ संस्थांची मान्सून आढावा बैठक पार पडली होती. यावेळी रेल्वे मार्गावरील पाणी भरणाऱ्या प्रमुख ठिकाणी अर्थात, कुर्ला आणि सायन मार्गावर एक हजार क्युबिक मीटर प्रति तास पाण्याचा उपसा करणारे पंप बसविण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली होती. तसेच मध्य रेल्वेचे ४२ आणि महापालिकेचे १८ असे एकूण ६० पंप रेल्वे मार्गावर बसविण्यात आल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा यंदा १७ अधिक पंप रेल्वेच्या मार्गावर असल्याचा दावाही रेल्वेकडून करण्यात आला होता. मात्र तरी देखील यंदा याच कुर्ला आणि सायन भागात पहिल्याच पावसात पाणी साचले.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -