आता सेंट जॉर्जमध्ये तुम्ही करु शकाल मॉर्निंग वॉक!

सेंज जॉर्ज बंद अवस्थेत असलेल्या गार्डनच्या सुशोभिकरणाचं काम सध्या हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच तिथल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनी गार्डनमध्ये ताजी हवा आणि मॉर्निंग वॉकचा आनंद घेता येणार आहे.

Mumbai
St.george hospital
सेंट जॉर्ज हॉस्पिटल

एखादा रुग्ण उपचारांसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला की, तिथली अस्वच्छता बघून आपण आणखी आजारी पडू का? हीच भीती रुग्णांना वाटते. तसंच, आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे गरीब वर्ग सरकारी आणि पालिका हॉस्पिटलमध्येच धाव घेतात. मात्र, तिथली अस्वच्छता, अव्यवस्था रुग्णांना त्रासदायक ठरते. पण, आता सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलच्या आवारात गेल्यानंतर तुम्हाला व्यायाम, मॉर्निंग वॉक आणि स्वच्छ हवा मिळणार आहे. शिवाय, लहान मुलांना खेळण्यासाठी ही पर्याय उपलब्ध होणार आहेत!

म्हणून होणार गार्डनचं सुशोभिकरण!

याचं कारण म्हणजे, आवारातीलच काही काळापासून बंद असलेल्या गार्डनच्या सुशोभिकरणाचे काम आता सुरू करण्यात आलं आहे. ज्यामुळे इथे काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवाय रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या गार्डनमध्ये जाऊन आपला मानसिक ताण कमी करण्यास मदत होणार आहे. त्यासोबतच ‘त्यांना व्यायाम करता येऊ शकेल. मॉर्निंग वॉक करता येऊ शकेल’, अशी माहिती सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली आहे.

वापरात नसल्याने गार्डन बंद

खासगी हॉस्पिटलमध्ये अनेकदा अशा सुविधा आपल्याला पाहायला मिळतात. पण, सरकारी हॉस्पिटलमध्ये तेवढ्या प्रमाणात रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी गार्डनची सोय नसते. इथे हॉस्पिटलच्या आवारात गार्डन आधीपासून होतं. पण, ते वापरात नसल्यामुळे तसंच बंद होतं. आता त्याचं सुशोभिकरण करुन ते रुग्ण, नातेवाईक आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसाठी खुलं केलं जाणार आहे. जेणेकरून त्यांना खेळती आणि शुद्ध हवा मिळू शकणार आहे.

पूर्णपणे बरं होण्यासाठी चांगल्या वातावरणाची ट्रीटमेंटही खूप महत्त्वाची असते. त्यासोबतच ज्या नातेवाईकांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही, ते या गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक करू शकतील. लोकांचं मन आणि शरीर सुदृढ राहावं, हाच यामागचा उद्देश आहे.

डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज हॉस्पिटल

तसंच, सीएसआर फंडातून या गार्डनच्या सुशोभिकरणाचं काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असून पुढच्या १५ दिवसांत याचं उद्घाटन केलं जाणार असल्याचंही डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – जे.जे. हॉस्पिटलमध्ये ‘देणगी समिती खाते’ सुरू

आता शिस्त महत्त्वाची!

या विषयी जे.जे. ग्रुपच्या हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितलं की, “हा खूप चांगला प्रकल्प आहे. रुग्णांना कशा चांगल्या पद्धतीने सुविधा देता येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या गार्डनचा मेंटेनन्सही पहावा लागेल. शिवाय, तिथली स्वच्छताही राखावी लागेल. त्यासाठी शिस्त महत्त्त्वाची आहे. या गार्डनमध्ये आल्यानंतर रुग्णांना आणि नातेवाईकांना फ्रेश वाटणार आहे!”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here