घरमुंबईटँकर उलटल्याने गॅस गळती

टँकर उलटल्याने गॅस गळती

Subscribe

कसारा परिसरात भीती

मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती सुरू झाली. घाटातील सत्यमेव जयते या ठिकाणावर हा अपघात झाला. त्यामुळे परिसरात भीती पसरली होती. स्थानिक व महामार्ग पोलिसांनी आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या चमुने सुरू केलेली धोका टाळण्याची प्रतिबंधात्मक कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टँकर उलटल्यावर पिक इन्फ्रा कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. या घटनेनंतर मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक सकाळच्या वेळेत दोन तास ठप्प झाली होती. त्यानंतर घाटाच्या पायथ्यापासून नाशिककडे जाणारी वाहतूक वळविण्यात आल्याने दोन्ही दिशेने जाणार्‍या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशामक दलाला पचारण केले होते. नागमोडी वळण कापत असताना अचानक गॅस टँकर पलटी झाल्याने आणि त्यातून अल्पप्रमाणात गॅस गळती सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये भीती पसरली. पोलिसांनी तत्काळ नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक तीन-चार किलोमीटर दूरवर थांबवली. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर दुपारच्या वेळेत पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून कोंडी फोडण्यात आली.

- Advertisement -

टँकरमध्ये जवळपास बारा टनहून अधिक गॅस असल्याने आसपासच्या गावांना धोका होता. मात्र पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने हालचाल करून सांभाव्य दुर्घटना टाळली. यावेळी नाशिक महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय लोखंडे, कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तू भोये,पिक इन्फ्रा कंपनीचे अधिकारी- कर्मचारी, अग्निशमन बंब, रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या मदतीने टँकर हटवण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -