घरमुंबईगटारीच्या एका दिवसात दीड लाख बोकडांची कुर्बानी

गटारीच्या एका दिवसात दीड लाख बोकडांची कुर्बानी

Subscribe

रविवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्यामुुळे शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मांसाहारी मंडळींनी गटारी साजरी केली. बरेच लोक शनिवारी मांसाहार करत नसल्यामुळे त्यांनी गटारीसाठी शुक्रवारचा मुहूर्त साधला. शुक्रवारी एका दिवसात दीड लाख बोकडांची कुर्बानी करण्यात आली.

रविवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्यामुुळे शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मांसाहारी मंडळींनी गटारी साजरी केली. बरेच लोक शनिवारी मांसाहार करत नसल्यामुळे त्यांनी गटारीसाठी शुक्रवारचा मुहूर्त साधला. शुक्रवारी एका दिवसात दीड लाख बोकडांची कुर्बानी करण्यात आली. गटारीसाठी मटण खरेदी करण्याकरता लोकांनी गर्दी केली होती. महत्वाची बाब म्हणजे बोकडाच्या मटणाची विक्री चिकनच्या तुलनेत अधिक होती. काही दिवसांपूर्वी भिवंडीत मेलेल्या आणि रोगट कोंबड्यांचे मांस चायनीजमध्ये वापरले जात असल्याचे लक्षात आल्यावर एफडीआयने अधिक सतर्कता दाखवली. मात्र या घटनेचा फटका चिकनच्या विक्रीवर झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

देवनारच्या कत्तल खान्यात रोज सरासरी ७५ हजार बोकड कापले जातात. शुक्रवारी गटारीच्या दिवशी ही संख्या दीड लाखावर म्हणजे दुप्पट झाली होती. इतर दिवशी साधारणपणे ७०,००० ते ८०,००० बकरे देवनारला कापले जातात, मात्र गटारीसाठी शुक्रवारी दिवसभरात साधारणपणे दीड लाखांहून अधिक बकरे कापले गेले. तर फक्त २ लाख कोंड्याचा खप झाला, जो एरवी ३ ते ४ लाखांपर्यंत जातो. मटन सोबतच मुंबईतील सर्व मच्छी मार्केटमध्येही ग्राहकांची गर्दी होती. यंदा नारळी पौर्णिमेच्या आधीच मोठ्या बोटी समुद्रात उतरल्या, त्यामुळे शुक्रवारी बाजारात ताजे मासे दिसत होते. त्यांचे भावही गगणाला भिडलेले होते. लोकांनी वाईन शॉपच्या समोरही गर्दी केली होती. दररोज ४०० ते ४५० रुपयांना मिळणारे मटण शुक्रवारी चक्क ५०० ते ५१० रुपयांपर्यंत मिळत होते.

- Advertisement -

दररोज आमच्या दुकानातून दिवसाला साधारणपणे ३०० ते ३५० कोंबड्या विकल्या जातात, मात्र आज गटारी असूनसुद्धा कोंबड्या रोजच्या पेक्षा कमी संख्येने विकल्या गेल्या.
– मोमीन शेख, विक्रेता

या अगोदर एफडीआयने केलेल्या कारवाईमुळे आम्ही घाबरलो आहोत. उगीच तब्येत खराब होऊ नये, म्हणून आम्ही चिकन विकत घेणे टाळले. त्याऐवजी मटणाला प्राधान्य दिले. जरी मटण महाग असले, तरी ते आम्ही स्वीकारले.
– मंजुळा कोळी, गृहिणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -