घरमुंबईलिंगपरिवर्तनामध्ये पुरुष पुढे

लिंगपरिवर्तनामध्ये पुरुष पुढे

Subscribe

शीव रुग्णालयात २८ शस्त्रक्रिया

पोलीस कॉन्स्टेंबल ललिता साळवे यांना लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी मिळालेल्या परवानगीनंतर पुन्हा एकदा लिंगपरिवर्तनाचा मुद्दा समोर आला. त्यातच लिंगपरिवर्तन या शस्त्रक्रियेमध्ये पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत जास्त असल्याचं आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दिलेल्या माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ५ ते ६ वर्षात शीव रुग्णालयात एकूण २८ लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर, लिंगपरिवर्तनामध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त असल्याचं समोर आलं आहे.

शीव रुग्णालयात झालेल्या लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेमध्ये २१ पुरुषांनी लिंग परिवर्तन करुन घेतलं आहे. तर, महिला असून पुरुषांचे हार्मोन्स जास्त असल्याने पुरुष बनण्यासाठी ७ जणांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर दोन प्रकरणांमध्ये गंभीर स्थिती उद्भवली होती. पण, उपचारांनंतर कोणतीही गुंतागुंत दिसून आली नसल्याचंही अहवालात नमूद केलं आहे.

- Advertisement -

“लिंग बदल शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी लोक लाजतात. लगेच तयार होत नाही. पण, आता जागरूकतेमुळे लिंगपरिवर्तन ही शस्त्रक्रिया करून घेण्यास लोक प्राधान्य देतात. आम्ही चार मोठ्या रुग्णालयांतून लिंगपरिवर्तनाबाबतच्या शस्त्रक्रियेचा अहवाल मागवला होता. नायर, कूपर, शीव आणि केईएम या रुग्णालयांपैकी फक्त एकाच रुग्णालयाची ही माहिती आहे. पण, तरीही ही संख्या कमी आहे”.
– चेतन कोठारी, आरटीआय कार्यकर्ते

तर, मुलं किशोरवस्थेत असताना मुलांमध्ये असे बदल आढळतात. एवढ्या लहान वयात असे बदल जाणवले की त्यांना ही साहजिकच भीती वाटते. पण, सामान्यपणे १८ वर्षांच्या नंतर मुला-मुलींना समंजसपणा येतो. त्यानंतरच ही मुलं निदानासाठी किंवा सल्ल्यासाठी दाखल होतात. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही महत्त्वाचा असतो. त्यामुळे लिंगपरिवर्तनासाठी त्यांचं आधी समुपदेशन केलं जातं. असं, शीव रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निलेश शाह यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -