घरमुंबईफुजीफिल्मतर्फे जीएफएक्स ५० एस, अल्ट्रा-हाय इमेज दर्जाचा मिररलेस कॅमेरा भारतात दाखल

फुजीफिल्मतर्फे जीएफएक्स ५० एस, अल्ट्रा-हाय इमेज दर्जाचा मिररलेस कॅमेरा भारतात दाखल

Subscribe

येत्या ३-४ वर्षांमध्ये भारतातील मिररलेस कॅमेरा आणि लेन्स मार्केटमधील ३० टक्के शेअर काबीज करण्याचे ध्येय

फुजीफिल्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बहुप्रतिक्षित जीएफएक्स ५०एस मध्यम फॉरमॅट मिररलेस कॅमेरा लाँच करण्याची घोषणा गुरुवारी मुंबईत केली. हा कॅमेरा सर्वोत्तम दर्जाच्या इमेजसाठी निर्माण करण्यात आला असून यात ५१.४ एमपीसह ४३.८३२.९ मिमी मीडियम फारमॅट अर्थात फुजीफिल्म जी फॉर्मेट सेंसर देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यामुळे चांगल्या दर्जाचे फोटो काढण्याची संधी फोटोप्रेमींना मिळू शकते.

- Advertisement -

भारतीय बाजारपेठेत एक्स सिरीजच्या विस्ताराकरिता फुजीफिल्म इंडिया रिटेल विक्री क्षेत्रामध्ये आपली उपस्थिती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत असून आपल्या टच पाँइटस्‌चा विस्तार करण्याची योजना सध्या करत आहे. आर्थिक वर्ष २०१८च्या शेवटपर्यंत आणखी ५० सर्व्हिस कलेक्शन पॉइंटस्‌ सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. याव्यतिरिक्त, कंपनी या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत फुजीफिल्म प्रोफेशनल सर्व्हिसच्या स्थापनेकरिता देखील विचार करत आहे. एक्स सिरीजला ब्रँड बनवण्याकरिता फुजीफिल्म इंडिया मार्केटिंग प्रचार, कार्यशाळा, प्रदर्शने, ऑनलाईन प्रचार आणि फोटोग्राफर असोसिएशन्समध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. या उपक्रमांद्वारे कंपनीचे लक्ष्य पुढील ३-४ वर्षांमध्ये भारतात मिररलेस कॅमेरा आणि लेन्स मार्केटमध्ये ३० टक्के शेअर प्राप्त करायचे कंपनीचे ध्येय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -