घरमुंबई..तर आणखी ३५ जणांचा जीव गेला असता!

..तर आणखी ३५ जणांचा जीव गेला असता!

Subscribe

घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटलजवळच्या जीवदया लेनजवळ गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एक चार्टर्ड विमान कोसळले आणि एकच खळबळ माजली. दुपारची वेळ असल्यामुळे कामगार जेवणाच्या सुट्टीवर गेले होते. त्यामुळे ३० ते ३५ लोकांचे प्राण वाचले आहेत.

“आमची दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. म्हणून सर्व‌ कामगार बेसमेंटमध्ये गेले होते. नाहीतर कदाचित ३० ते ३५ जणांना जीव गमावावा लागला असता”, अशी प्रतिक्रिया बिल्डिंगमध्ये काम करणारे मुकादम कौशल कुमार निशाद यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली. घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटलजवळच्या जीवदया लेनजवळ गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एक चार्टर्ड विमान कोसळले आणि एकच खळबळ माजली. या घटनेत पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण जखमी झालेले आहेत. तसेच ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या इमारतीचे बांधकाम चालू असल्यामुळे कोणतेही रहिवासी या संकटात सापडले नाहीत मात्र बांधकाम मजूर देखील या घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.

मी खाली पार्किंग मध्ये उभा होतो. माझा भाचा नरेश कुमार निषाद बिल्डिंग मध्ये काम करत होता. त्याच्या बरोबर आणखी दोघे काम करत होते. माझा भाचा काम करत होता तेव्हाच ही घटना घडली, असे नरेशचा मामा कौशल कुमार निशाद यांनी सांगितले. तसेच जर लंच ब्रेक झाला नसता तर जवळपास ३० ते ३५ जणांना आपला जीव गमावावा लागला असता अशीही भीती कौशल यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

नरेश कुमार निशाद (२४) हा आताच छत्तीसगढहून मुंबईत कामासाठी दाखल झाला आहे. जखमी नरेशकुमार निशाद १५ टक्के भाजलाय. चेहरा, छाती आणि हाताला जखमा झाल्या आहेत. नरेशकुमार निशाद आणि लवकुशकुमार हे दोघेही बांधकाम साईटवरचे मजूर कामगार आहेत. दररोज ३०० रुपये एवढी त्यांची कमाई होते. तर, या दोघांसोबतच आणखी एक मुलगा जखमी झाला आहे.

मुंबईच्या घाटकोपर परिसरात चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना घडली. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. घटना घडली त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या‌. शिवाय, पोलिसही घटनास्थळी पोहोचले. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तिघे जण जखमी झाले आहेत. तिघांवरही राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांची नावे

  • कॅप्टन प्रदीप राजपूत
  • कॅप्टन मारिया झुबेर
  • सुरभी – इंजिनीअर
  • मनीष – टेक्नीशियन
  • आणखी एका व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

जखमींची नावे

  • लवकुश कुमार (२१)
  • नरेशकुमार निशाद (२४)
  • प्रशांत महाकाल (२३)
Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -