घरमुंबईमनसेकडून महापौरांना 'शिवछत्रपतींची स्त्री - नीती' हे पुस्तक भेट

मनसेकडून महापौरांना ‘शिवछत्रपतींची स्त्री – नीती’ हे पुस्तक भेट

Subscribe

महापौरांनी केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत जाहीरपणे माफी मागावी आणि स्वतःचे आत्मपरिक्षण करावे, अशी मनसे कार्यकर्त्यांची मागणी

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथील पटेल नगरमध्ये एका महिलेचा हात पिरगळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी महापौर बंगल्यावर धडक दिली. वारंवार बेताल वक्तव्य करणाऱ्या आणि महिलांशी असभ्य वर्तन करणार्‍या महापौरांनी वर्तनात सुधारणा करावी, असे निवेदन देखील मनसे कार्यकर्त्यांकडून महापौरांना देण्यात आले. त्यानंतर आज मनसे कार्यकर्ते महापालिकेत दाखल झाले असून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना ‘शिवछत्रपतींची स्त्री – नीती’ हे पुस्तक भेट देणार आहेत.


हेही वाचा – महापौरांविरोधात मनसे आक्रमक; राजीनाम्याची मागणी

असे म्हटले आहे निवेदनात…

मनसेकडून देण्यात आलेल्या निवेदनात ते प्राध्यापक असण्याची आठवण करून देण्यात आली. ‘तुम्ही मुंबईचे प्रथम नागरिक-महापौर या संविधानिक पदावर विराजमान आहात, असे असताना देखील महिलेचा हात धरून पिरगळणे अशोभनीय आणि असमर्थनीय कृत्य आहे, अशा कडक शब्दात मनसेकडून कानउघडणी करण्यात आली आहे. ”श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा आदर हा मानावर केला जात होता. अशा अनेक घटना देखील शिवकालीन इतिहासात आहेत. आपण सुद्धा त्याच मातीत आणि त्याच स्वराज्यात आहोत हे न विसरून जाता महिलांचा सन्मान आपण केला पाहिजे.”असे या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत जाहीरपणे माफी मागावी

दरम्यान, महापौरांच्या वर्तवणुकीमुळे सद्याच्या युगात चाललेल्या निती मुल्यांचा ऱ्हास झाला असून ‘शिवनिती’ नुसार ते शिक्षेस पात्र आहेत. स्वतःच्या चुकीची भलामण करत मनसेवर कोणत्याही प्रकारचे आरोप करून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये. तसेच महापौरांनी केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत जाहीरपणे माफी मागावी आणि स्वतःचे आत्मपरिक्षण करावे, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -