भाजप नेते गिरीश बापट यांच्या शासकीय बंगल्यातील सर्व्हट कॉर्टरला भीषण आग

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या शासकीय बंगल्याला आग लागली आहे.

Mumbai
Girish Bapats bungalow fire in Mumbai

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या मलबार हिल येथील शासकीय बंगल्याच्या परिसरामध्ये मोठी आग लागली. या बंगल्याचे नाव ज्ञानेश्वरी बंगला असे आहे. बंगल्याच्या सर्व्हट कॉर्टरला ही आग लागली. सिंलेडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडली. बंगल्यामध्ये लाकडी बांधकाम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग वाढली. सर्व्हट कॉर्टरमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी सामान होते. त्यामुळे आग जास्त भडकली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. गिरीश बापट यांचा बंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याच्या शेजारीच आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

गिरीश महाजनांना सर्वप्रथम निदर्शनास आले

सर्व्हट कॉर्टरमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर शेजारच्या बंगल्यातील गिरीश महाजन यांना सर्वप्रथम ही घटना निदर्शनास आली. त्यांनी ताबडतोब अग्निशमन दलाला याविषीची माहिती दिली. परंतु, कॉर्टरमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी सामान असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. घटनास्थळी ताबडतोब अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या. अग्निशनम दलाच्या कठोर परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु आहे.

गिरीश बापट मुंबईच्या दिशेला रवाना

दरम्यान, आगीची माहिती मिळताच गिरीश बापट मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत.