चहाचे निर्माते गिरनार फूड अँड बेव्हरेज प्रा. लि. कंपनीने त्यांच्या ‘रॉयल’ ट्रेडमार्क उल्लंघनाप्रकरणी अलीबाबा ग्रुप होल्डिंग बॅक्ड फूड आणि किरकोळ विक्रेता बिग बास्केट यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
ऑनलाइन विक्रीच्या जाहिरातीत वापरला ट्रेडमार्क
बिग बास्केट सुपरमार्केटमध्ये पुरवठा करणाऱ्या दोन खासगी नोंदणीकृत कंपन्यांविरोधात गिरनार या चहाच्या निर्मात्याने कोर्टात धाव घेतली आहे. बिग बास्केटने त्यांचा किराणा ऑनलाइन पद्धतीने विक्री करण्यासाठी जाहिरात केली होती. या जाहीरातीत गिरनार चहाच्या रॉयल ट्रेडमार्कचा वापर करण्यात आला होता. यावर आक्षेप घेत गिरनारने बिग बास्केटला कोर्टात खेचले आहे.
गिरनारचा प्रमुख ब्रँड ‘रॉयल’
बिग बास्केट दुकानांमध्ये रॉयल ब्रॅण्ड अंतर्गत अनेक उत्पादनांची विक्री केला जाते. यामध्ये धान्य, मसाले, मध आणि साखर समावेश आहे. परंतु गिरनार यांनी रॉयल ब्रँड अंतर्गत चहा विकण्यासाठी ई-कॉमर्स स्टार्टअपवर आक्षेप घेतला असून या संदर्भात याचिका दाखल केली आहे. गिरनार फूड अँड बेव्हरेज अनेक प्रकारचे चहा, विक्रेत्यांना विकतात. परंतु रॉयल कप चहा हा त्याचा प्रमुख ब्रँड आहे.
हायकोर्टाच्या वेबसाइटवर दिले उत्तर
गिरनार फूड्सने ७ मार्च रोजी कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी होणार आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाइटवर बिग बास्केटने ४ एप्रिल रोजी आपले उत्तर सादर केले होते. यानुसार त्यांनी गिरनारने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात प्रत्युत्तर देण्यासाठी अधिकचा वेळ मागितला होता.