घरताज्या घडामोडी'गरोदर महिला, दिव्यांग नागरिकांना उपचारासाठी लोकल प्रवासाची मुभा द्या'

‘गरोदर महिला, दिव्यांग नागरिकांना उपचारासाठी लोकल प्रवासाची मुभा द्या’

Subscribe

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकरांची उपनगरीय लोकल सेवा बंद आहे. राज्य सरकारने पुनश्च हरिओमची घोषणा केली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल नेमकी कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे गरोदर महिला आणि दिव्यांग नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी बेस्ट आणि एसटी बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे या परिस्थितीत त्यांना लोकल सेवेत प्रवेश देण्याची मागणी ठाण्यातील कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने केली आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

लॉकडाऊन काळात भारतीय रेल्वेने सर्व मेल एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. आता अनलॉकमध्ये भारतीय रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू आहेत. मात्र, आतापर्यंत सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू झालेली नाही. फक्त लोकल सेवा ही मर्यादित स्वरूपात सध्या शासकीय कर्मचार्‍यांसाठी धावत आहे. पंरतु, सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल नेमकी कधी सुरू होणार? याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच गरोदर महिला आणि दिव्यांग प्रवाशांना रुग्णालयात नियमित तपासणीसाठी जाताना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. बराचसा वेळ वाहनाची वाट पाहणे, वाहतुकीवरील परिणाम, तसेच खड्ड्यांमुळे होणारा त्रास गरोदर महिला आणि दिव्यांग प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

इतकेच नव्हेतर लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिकद्दष्ट्या कमकुवत परिस्थिती असताना नाईलाजास्तव गरोदर किंवा दिव्यांग रुग्णांच्या कुटुंबियांना खासगी वाहनाने रुग्णालयात घेऊन जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड बसतो आहे. त्यामुळे परिस्थिती बघता लोकल सेवेत प्रवेश देण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने केली आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

शारीरिकदृष्ठ्या अपंग असणार्‍या नागरिकांना योग्य ती पडताळणी करून लोकल सेवेत प्रवेश देण्यात यावा. तसेच गरोदर महिलांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जाण्याकरिता लोकल सेवेत प्रवेश देण्यात यावा. जेणेकरून त्यांना होणारा त्रास कमी होईल. – राजू सुदाम कांबळ, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ, ठाणे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -