घरमुंबईमुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्कार

मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्कार

Subscribe

उच्च शिक्षणात तंत्रज्ञानावर भर दिल्याबद्दल गौरव

उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरील २०१९ चा ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेटर फेस्टिव्हलमध्ये प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या वतीने हा पुरस्कार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी स्वीकारला.

राजस्थानमधील स्कुन्यूज ग्लोबल एज्युकेशन ही शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या संस्थांचा गौरव करते. उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार देण्यात आला. शिक्षणात नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे सोनम वायचुंग व राजस्थानमधील विज्ञान ट्रस्टचे विश्वस्त लक्षराजसिंग मेवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाने २०१७ पासून परीक्षांसाठी ऑनस्क्रीन मार्किंग (ओएसएम) पद्धत सुरू केली. प्रत्येक परीक्षेला जवळपास १३ ते १६ लाख उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्याचे ऑनलाइन मूल्यांकन केले जाते. ४५० पेक्षा जास्त परीक्षांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया ओएसएमद्वारे करणारे मुंबई विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. त्याचप्रमाणे डिजिटल पेपर डिलिव्हरी, ऑनलाईन पुनर्मुल्यांकन, ऑनलाईन पीएचडी प्रवेश परीक्षा, ऑनलाईन परीक्षा अर्ज, ऑनलाईन प्रवेश, ऑनलाईन संलग्नता अशा अनेक तंत्रज्ञानयुक्त सोयी सुविधा विद्यापीठाने सुरू केल्याबद्दल या पुरस्काराने गौरवण्यात आले.

तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन विद्यार्थी, शिक्षक व कॉलेजला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशासनात गतिमानता आणणे हाच उद्देश आहे. भविष्यातही अनेक सुविधा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध करून दिल्या जातील.
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -